Pandharpur: विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तांसाठी नवी नियमावली

140
Pandharpur: विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तांसाठी नवी नियमावली
Pandharpur: विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तांसाठी नवी नियमावली
Pandharpur : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम (Pahalgam terrorist attack) येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिराच्या (Shri Vitthal-Rukmini Temple) सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. (Pandharpur)
(हेही वाचा – Cochin Shipyard Share Price : तगडा लाभांश देणाऱ्या या संरक्षण क्षेत्रातील कंपनीबद्दल संशोधन संस्था सकारात्मक)

मंदिर समितीच्या (Shri Vitthal Rukmini Temple Committee) निर्णयानुसार व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या सूचनेनुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणार्‍या प्रवेशद्वारावर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व तपासणी तसेच मंदिरात मोबाईल व कॅमेरासदृश प्रवेश बंदीची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्व कर्मचार्‍यांना ओळखपत्र परिधान करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कर्मचार्‍यांना मंदिरात प्रवेश करणे व बाहेर पडण्यासाठी फक्त व्हीआयपी गेटचा वापर करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Chitra Wagh यांचा राहुल गांधींना टोला; “नव्याने इतिहास लिहिण्याची तुमची खोड जाणार नाहीच पण…”)

कडक अंमलबजावणी करण्यात येणार
मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी असून, त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर समितीमार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही यावेळी श्रोत्री यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.