Pandharpur Darshan : आषाढीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी; भाविकांनी दर्शनरांगेतच दिल्या घोषणा

Pandharpur Darshan : अकरा वाजल्यापासून दर्शन रांगेत उभारलेल्या भाविकांना दर्शन न मिळाल्याने अनेक भाविकांनी दर्शन रांगेतच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी केली.

151

दर्शन रांगेतील भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. पुणे येथून दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पदस्पर्श दर्शनाची रांग लांबपर्यंत गेली होती. सकाळी अकरा वाजल्यापासून दर्शन रांगेत उभारलेल्या भाविकांना दर्शन न मिळाल्याने अनेक भाविकांनी दर्शन रांगेतच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. (Pandharpur Darshan)

(हेही वाचा – kiwi fruit benefits : किवी फळ खाल्ल्याने शरीराला मिळतात अद्भुत फायदे; अनेक रोगांवर करता येते मात)

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध केली आहे. ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना बराच वेळ पदस्पर्श दर्शनासाठी उभे राहावे लागले होते. यातूनच या भाविकांचा संताप अनावर झाला. भाविकांनी मंदिर समितीच्या ढिसाळ कारभाराविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

याबाबत मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना विचारले असता ते म्हणाले, सध्या प्रायोगिक तत्त्वावर टोकन दर्शन सुविधा सुरू केली आहे. त्यातच ऑनलाइन दर्शन देखील सुरू आहे. त्यामुळे सकाळी काही वेळ दर्शन रांगेतील भाविकांना थांबावे लागले होते. मात्र, दर्शन रांग कुठेही थांबून व्हीआयपींना दर्शन देण्यात आलेले नाही. (Pandharpur Darshan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.