-
प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी राज्य सरकारकडून भव्य नियोजन करण्यात आले आहे. यंदा राज्य परिवहन महामंडळातर्फे ५२०० विशेष एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूर येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. (Pandharpur Ashadhi Wari)
गाव ते पंढरपूर थेट सेवा – ग्रुप बुकींगवर विशेष सुविधा
यात्रेच्या काळात राज्याच्या कोणत्याही गावातून ४० अथवा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास, त्यांच्या गावातून थेट पंढरपूरसाठी एसटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले. या बससेवेवर सरकारच्या “महिला सन्मान योजना” अंतर्गत महिलांना ५०% सवलत आणि “अमृत ज्येष्ठ नागरिक योजना” अंतर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास सुविधा मिळणार आहे. (Pandharpur Ashadhi Wari)
(हेही वाचा – Raja Suryavanshi Murder Case : सोनम, राजसह सर्व आरोपींची चौकशी होणार, शिलाँग कोर्टाने ८ दिवसांची सुनावली पोलीस कोठडी)
बसचालक आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था
प्रवासीसेवेसोबतच बस चालक व वाहक यांच्यासाठीही प्रवासात योग्य सोयी-सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राहण्याची व्यवस्था, गरम पाण्याची सोय, तसेच बसस्थानकांवर गाड्यांची देखभाल-दुरुस्ती आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची नेमणूक यांचा समावेश आहे. (Pandharpur Ashadhi Wari)
विना तिकीट प्रवासावर एसटीचा ‘कडक डोळा’
प्रवाशांनी तिकीट न काढता प्रवास केल्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी १२ ठिकाणी तपासणी नाके, तसेच २०० एसटी सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी २४ तास पंढरपूर परिसरात तैनात राहणार आहेत. (Pandharpur Ashadhi Wari)
(हेही वाचा – BMC : प्रारुप प्रभाग रचनेबाबत अशाप्रकारे दक्षता घ्या; नगरविकास खात्याची महापालिकांना सूचना)
वाहतूक सुरळीत करण्यासाठी एसटी-पोलीस एकत्र
यात्रेच्या दिवशी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने तैनात करण्यात येणार आहेत. (Pandharpur Ashadhi Wari)
चार तात्पुरत्या बसस्थानकांची उभारणी
गर्दीचे व्यवस्थापन सुकर करण्यासाठी यंदा पंढरपूरमध्ये चार तात्पुरती बसस्थानके – चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज), विठ्ठल कारखाना – उभारली जाणार आहेत. प्रत्येक बसस्थानकावर पिण्याचे पाणी, शौचालय, चौकशी कक्ष, आरक्षण केंद्र, फलक आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. (Pandharpur Ashadhi Wari)
जिल्हानिहाय प्रवासाचे नियोजन
- चंद्रभागा बसस्थानक – मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा
- भिमा देगाव स्थानक – औरंगाबाद (छ.सं.नगर), नागपूर, अमरावती
- विठ्ठल कारखाना – नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
- पांडुरंग स्थानक – सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
(हेही वाचा – China Thanks Indian Navy ;’या’ कारणासाठी चीनने भारताचे मानले आभार)
गतवर्षी २१ लाख प्रवाशांचा सुखरूप प्रवास
मागील वर्षी एसटीने ५ हजार विशेष बसेसद्वारे २१ लाख भाविकांचा सुरक्षित प्रवास केला होता. यंदा ही संख्या आणि सुविधा अधिक व्यापक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (Pandharpur Ashadhi Wari)
“भाविकांनी या सुरक्षित व सवलतीच्या एसटी सेवेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. राज्य शासनाचे हे व्यापक नियोजन यात्रेतील बिनधास्त दर्शन व सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. (Pandharpur Ashadhi Wari)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community