पाकिस्तानच्या आर्थिक संकटामुळे, एकीकडे जनता महागाईने त्रस्त आहे आणि जनता उपासमारीने मरत आहे. दुसरीकडे, पाकिस्तान सरकार नेत्यांवर दयाळूपणा दाखवत आहे. आयएमएफसमोर कर्जाची भीक मागणाऱ्या पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pak PM Shahbaz Sharif) यांच्या सरकारने राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष आणि सिनेटचे अध्यक्ष यांचे मासिक वेतन औपचारिकरित्या १३ लाख रुपये केले आहे. शनिवारी माध्यमांनी हे वृत्त दिले. नवीन वेतन त्यांच्या मागील २,०५,००० रुपयांच्या पगाराच्या ६ पट जास्त आहे. (Pakistan)
(हेही वाचा – पहलगाम हल्ल्यात हुतात्मा झालेल्या लेफ्टनंट Vinay Narwal यांच्या पत्नीचा धर्मांध मुसलमान मोहिबुल हक आणि गुलाम जिलानीने AI द्वारे केला अश्लील व्हिडीओ)
पाकमधल्या एक दूरदर्शन वाहिनीवरील वृत्तानुसार, संसदीय कामकाज मंत्रालयाने २९ मे या दिसशी अधिसूचना जारी केली होती, परंतु यासंबंधी शुक्रवारी सविस्तर माहिती समोर आली. अधिसूचनेनुसार, दोन्ही अधिकाऱ्यांचे मासिक वेतन १३ लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे आणि त्याव्यतिरिक्त, त्यांना तात्पुरता भत्ता म्हणून अतिरिक्त ५० टक्के रक्कम देखील मिळेल. सुधारित वेतनश्रेणी १ जानेवारी २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल.
(हेही वाचा – Flood : आसाममधील पूरस्थितीत सुधारणा; १२ जिल्ह्यात ३ लाखांहून अधिक लोकांना बसला पुराचा फटका)
यापूर्वी २१ मार्च रोजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आल्याची बातमी आली होती. संघीय मंत्री, राज्यमंत्री आणि सल्लागारांच्या वेतनात १८८ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. संघीय मंत्री आणि राज्यमंत्री (भत्ते आणि वेतन) कायदा, १९७५ मध्ये सुधारणांना मंजुरी देण्यात आली, ज्यामुळे या वाढीचा मार्ग मोकळा झाला. विधेयकाच्या मंजुरीनंतर, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री आणि सल्लागार यांचे सुधारित वेतन ५,१९,००० रुपये होईल. पूर्वी केंद्रीय मंत्र्यांना २,००,००० रुपये मिळत होते, तर राज्यमंत्र्यांना १,८०,००० रुपये मिळत होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community