Pakistani citizens : त्या ‘तीन’ पाकिस्तानींनी मुंबई सोडली; सर्व पाकिस्तानी अल्पकालीन व्हिसावर आले होते भारतात 

84

Pakistani citizens : जम्मू काश्मीर येथिल पहलगाम येथे २२ एप्रिलला आतंकवादी हल्ला (Pahalgam terrorist attack) झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. त्यामुळे या आतंकवादी हल्ल्यामुळे (Terrorist attack) भारत आणि शेजारील राष्ट्र पाकिस्तानचे संबंध तणावग्रस्त झाले आहेत. अशातच भारत देशांनी पाकिस्तानसाठी सिंधू पाणी करार रद्द (Indus Water Treaty cancelled) केला तर पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासात भारत देश सोडण्याचे आदेश दिले होते. (Pakistani citizens)

(हेही वाचा – Pahalgam Attack : पाकिस्तानी दहशतवाद्यांना आदिलनेच दाखवला होता ‘रस्ता’)

यातच मुंबईत (Mumbai) राहणाऱ्या १७ पाकिस्तानी नागरिकांना मुंबई पोलिसांनी एक्झिट परमिट दिल्यानंतर त्यातील १४ जणांनी सोमवारी देश सोडला. तर, वैद्यकीय कारणामुळे उर्वरित तीन पाकिस्तानी नागरिकांनीही देश सोडल्याची माहिती आहे. हे सर्व पाकिस्तानी नागरिक अल्पकालीन व्हिसावर तसेच पर्यटनासाठी आले होते.

यामध्ये, सार्क व्हिसा (SAARC Visa) असलेल्यांना २६ एप्रिलपर्यंत, वैद्यकीय व्हिसावरील नागरिकांना २९ एप्रिलपर्यंत तर १२ प्रवर्गातील व्हिसाधारकांसाठी गेल्या आठवड्यात रविवारची मुदत होती. त्यात आगमनानंतर व्हिसा, व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, ट्रान्झिट, परिषद, गिर्यारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, गट पर्यटक, यात्रेकरू आणि गट यात्रेकरू यांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारच्या घोषणेनंतर तत्काळ सर्व पाकिस्तानी नागरिकांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली. त्यानुसार, मुंबईतील १७ पाकिस्तानी नागरिकांना मुंबई पोलिसांनी एक्झिट परमिट दिल्यानंतर त्यातील १४ जणांनी सोमवारी देश सोडला. तर, तीन जणांनी वैद्यकीय कारणामुळे त्यानंतर देश सोडला. त्यानुसार, सर्व १७ ही पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले आहेत.

(हेही वाचा – Pahalgam Attack : पाकिस्तान एवढा घाबरला की जाहीर केला 12 दिवसांचा लॉकडाऊन)

‘या’ देशातून गेले पाकिस्तानात
भारत व पाकिस्तानदरम्यानची थेट हवाई वाहतूक बंद असल्यामुळे ‘हे’ पाकिस्तानी नागरिक थेट पाकिस्तानला न जाता दुसऱ्या देशांत उतरून दुसऱ्या विमानाने मायदेशी परतले. मुंबईतून गेलेले बहुसंख्य पाकिस्तानी नागरिक आखाती देशातून मायदेशी गेल्याचा अंदाज आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.