Pakistani Citizen : राजधानी दिल्लीत ५ हजार पाकिस्तानी; गुप्तचर यंत्रणेने सोपवली यादी

67

Pakistani Citizen : जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) जवळील पहलगाम येथे २२ एप्रिलला आतंकवादी हल्ला (Pahalgam terrorist attack) झाला. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पाकिस्तानी नागरिकांबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विविध राज्यांमध्ये पाकिस्तानी नागरिकांबाबत कारवाया सुरू केल्या आहेत. अशातच देशाची राजधानी दिल्ली येथे ५ हजार पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती गुप्तचर यंत्रनेनी दिली.  (Pakistani Citizen)

(हेही वाचा – जे ओवैसींना स्वीकारले, ते शरद पवारांना मात्र अमान्य; म्हणे, Pahalgam Terror Attack ला काही लोकांकडून धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न)

एकट्या दिल्लीतच पाच हजारहून अधिक पाकिस्तानी नागरिक राहत आहेत. पाकिस्तानींनी सीमेजवळील राज्येच नाहीत तर अगदी उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात देखील वास्तव्य केलेले आहे. आता सर्वच राज्यांत शोधमोहिम सुरु केली जाणार आहे. काही नागरिकच या पाकिस्तानींची माहिती देत आहेत. अशांना पकडून वाघा बॉर्डरवर (Wagah Border) धाडले जाणार आहे. दिल्लीत ५००० लोकांची ओळख पटविण्यात आल्याचे आयबीने म्हटले आहे. भारताच्या या गुप्तचर यंत्रणेने या लोकांची यादीच दिल्ली पोलिसांकडे (Delhi Police) दिली आहे.

तसेच महाराष्ट्र राज्यातील ४८  शहरांत ५०२३ पाकिस्तानी नागरीक आढळले आहेत. यापैकी १०७ जण बेपत्ता असून, त्यांचा कोणताही पत्ता तपास यंत्रणांना लागत नाही. राज्यात सर्वाधिक २४५८ पाकिस्तानी नागपूर शहरात आढळलेत. त्यानंतर ठाण्यात ११०६, तर मुंबईत १४ पाकिस्तानी राहत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे यापैकी केवळ ५१ पाक नागरिकांकडेच वैध दस्तऐवज आढळले आहेत.

(हेही वाचा – Pahalgam Attack : कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या मंत्र्याचे वादग्रस्त विधान; म्हणाले, दहशतवाद्यांनी धर्म विचारला नव्हता)

बेकायदा आलेल्यांचे काय…
परदेशातून आलेल्या कोणत्याही नागरिकांना ते ज्या शहरात जातात, तेथील जवळच्या पोलिस आयुक्तालय किंवा अधीक्षक कार्यालयात नोंद करावी लागते तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे असेल तरी तशी नोंद करावी लागते. परंतू जे बेकायदा आले आहेत, त्यांची कोणाकडेच नोंद नसते. या लोकांना भारतातीलच लोक बनावट कागदपत्रे, नातेवाईक असल्याचे सांगून असे कागद बनवून घेतात. यामुळे हे लोक राजरोसपणे राहतात. अशा लोकांना शोधण्याचे मोठे कष्ट यंत्रणेला घ्यावे लागणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.