पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आणि आम्हाला बदला हवाय अशी मागणी केली जाऊ लागली. तेव्हापासूनच पाकिस्तानविरोधात भारताकडून अनेक कठोर पावलं उचलली जात आहेत. भारत सरकार पाकिस्तानविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सिंधू कराराला स्थगिती, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश, अटारी वाघा बॉर्डर बंद, पाकिस्तानी सिनेमांना बंदी, पाकिस्तानच्या सेलिब्रिटींना बंदी यांसारख्या निर्णयानंतर आता पाकिस्तानी सेलिब्रिटींचे अकाऊंट्स भारतात बंद करण्यात आले आहेत. (Pahalgam Attack)
अकाऊंट भारतात उपलब्ध नाही
इन्स्टाग्रामवर या पाकिस्तानी कलाकारांचा युजर आयडी सर्च केला की, ‘अकाऊंट भारतात उपलब्ध नाही, असं दिसतं. कारण आम्ही या कंटेंटवर बंदी घालण्याच्या कायदेशीर विनंतीचं पालन केलं आहे, असाही मजकूर दिसतो. (Pahalgam Attack)
सिनेमावरही भारत सरकारची बंदी
या यादीत हानिया आमिरपासून ते इम्रान अब्बासपर्यंतच्या सेलिब्रिटींची नावं आहेत. भारतात पाकिस्तानी सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे, ज्यामुळे सेलिब्रिटींच्या फॉलोअर्समध्ये मोठी घट झाली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, हानिया आमिर आणि माहिरा खान यांनीही पहलगाममधील हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं होतं. याव्यतिरिक्त फवाद खान याच्या सिनेमावरही भारत सरकारनं बंदी घातली होती. (Pahalgam Attack)
‘या’ पाकिस्तानी सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट बॅन
भारतात ज्या पाकिस्तानी कलाकारांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे, त्यात लोकप्रिय अभिनेत्री हानिया आमिरचाही समावेश आहे. याशिवाय, रईस चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसलेली माहिरा खान, मॉम चित्रपटात श्रीदेवीसोबत काम करणारी सजल अली आणि ऐ दिल है मुश्किलमध्ये दिसलेला इमरान अब्बास यांचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय अली जफरसह इतर अनेक अकाऊंटही सस्पेंड करण्यात आले आहेत. (Pahalgam Attack)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community