Randhir Jaiswal : जगातील कोणतीही शक्ती काश्मीरला पाकिस्तानपासून वेगळे करू शकत नाही, अशी वल्गना करणार्या पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर (PoK) रिकामा करावाच लागेल असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) यांनी गुरुवारी 17 एप्रिलला ठणकावून सांगितले. (Randhir Jaiswal)
(हेही वाचा – Sassoon Report: पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला ‘त्या’ प्रकरणात क्लिनचिट)
पाकिस्तानात आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर भारताच्या विरोधात गरळ ओकताना म्हणाले की, 13 लाखांचे भारतीय लष्कर (Indian Army) आणि त्यांचं सर्व सुसज्ज शस्त्रसाठा जर आपल्याला घाबरवू शकत नाही. जगातील कोणतीही ताकद काश्मीरला (Kashmir) पाकिस्तानपासून वेगळं करू शकत नाही. आमची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे. काश्मीर आमची शीरधमनी होती आहे आणि राहील. आम्ही ती विसरणार नाही. आम्ही आमच्या काश्मीरी बांधवांच्या शौर्यपूर्ण संघर्षात त्यांना एकटे सोडणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांना पाकिस्तानच्या निर्मितीची गोष्ट सांगितली पाहिजे. आपल्या पूर्वजांना वाटायचे की आपण हिंदूंपेक्षा प्रत्येक बाबतीत वेगळे आहोत. आपल्या चालीरीती, आपला धर्म, आपली विचारसरणी, सर्वकाही त्यांच्यापेक्षा वेगळे आहे. आपण एक नाही तर दोन राष्ट्रे आहोत. आम्ही हिंदूपेक्षा वेगळे आहोत. आपण पाकिस्तानच्या उभारणीसाठी खूप त्याग केले आहेत असे मुनीर म्हणाले होते.
(हेही वाचा – Cyber Fraud : मराठी हास्य कलाकाराला फसवल्याप्रकरणी एकाला अटक)
पाकिस्तानी लष्कर प्रमुखांच्या काश्मीर आणि द्विराष्ट्र सिद्धांतावरील विधानावर प्रतिक्रिया देताना जयस्वाल म्हणाले की, पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली होती. मात्र बांगलादेशची स्थापना होताच हा सिद्धांत अयशस्वी झाला. जम्मू-काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे. पाकिस्तानने बेकायदेशीररित्या कब्जा केलेली भाग (पाकव्याप्त काश्मीर) भारताला परत द्यावे लागणार आहे. कुठलीही परकीय गोष्ट शीरधमनीत कशी असेल ? जम्मू-काश्मीर हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके हा भूभाग पाकिस्तानचा नाही. पीओके हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ते पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेले आहे. पाकिस्तानला कोणत्याही किंमतीत पीओके रिकामा करावाच लागेल असे जयस्वाल यांनी ठणकावले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community