Pakistan Stock Exchange : मोठ्या युद्धापूर्वी पाकिस्तानची आर्थिक युद्ध लढतानाच दमछाक, शेअर बाजारात मोठी पडझड

पाकिस्तानमधील कराची शेअर बाजारात आठवडाभर कमालीचे उतार चढाव आहेत.

94
Pakistan Stock Exchange : मोठ्या युद्धापूर्वी पाकिस्तानची आर्थिक युद्ध लढतानाच दमछाक, शेअर बाजारात मोठी पडझड
Pakistan Stock Exchange : मोठ्या युद्धापूर्वी पाकिस्तानची आर्थिक युद्ध लढतानाच दमछाक, शेअर बाजारात मोठी पडझड
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध सध्या ताणलेले आहेत. त्यातच भारतीय लष्कराने बुधवारी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर वातावरणात अनिश्चितता भरून राहिली आहे. ही युद्घाची सुरुवात आहे का, हा प्रश्न भारतापेक्षा जास्त पाकिस्तानमध्ये सतावतो आहे. त्यामुळे पाकिस्तानी शेअर बाजारावर त्याचा विपरित परिणाम बुधवारी जाणवला. कराची स्टॉक एक्सचेंजचा १०० निर्देशांक बुधवारी तब्बल ३,५२१ अंशांनी म्हणजेच साडेतीन टक्क्यांनी कोसळला. तुलनेनं भारतीय निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये अर्ध्या टक्क्याची घसरण झाली आहे. पाकिस्तानला वाटणारी युद्धाची भीतीच यातून प्रतीत होत असल्यामुळे सर्व बाजूंनी कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानचा युद्धा आधीच झालेला हा पराभव असल्याचंही बोललं जातंय. (Pakistan Stock Exchange)

जम्मू – काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानवर युद्धाचे ढग जमले आहेत. अकरा दिवसांनंतर दोन्ही देशांनी जोरदार युद्धाभ्यास सुरू केल्याच्या बातम्याही आल्या आहेत. परिस्थिती तणावग्रस्त आहेच. आणि भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडण्याच्या दृष्टीने तिथून होणारी मालाची आयत बंद कऱणं, सिंधू जल करार (Indus Water Treaty) स्थगित करणं असे उपायही सुरू केले आहेत.

(हेही वाचा – Operation Sindoor : भारतीय सैन्यदलांनी शौर्य दाखवित रचला नवा इतिहास, संरक्षणमंत्र्यांचे गौरवोद्गार)

युद्धसदृश परिस्थितीचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत असतो. त्यामुळेच दोन्ही देशांतील शेअर बाजार गेले काही दिवस उचार चढावांनी भरलेले आहेत. पण, दोघांची तुलना करता पाकिस्तानातील कराची स्टॉक इंडेक्स या महत्वाच्या निर्देशांकात गेले काही दिवस कमालीची अस्थिरता दिसून येत आहे. दहशतवादी हल्ल्याच्या आठवड्यात तर पाकिस्तानी गुंतवणूकदारांचं १ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. पाकिस्तान प्रत्यक्ष युद्धापूर्वीच महत्त्वाचं आर्थिक युद्ध हरत आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. (Pakistan Stock Exchange)

कराची स्टॉक एक्सचेंज १०० निर्देशशांकाची एका आठवड्यात ७,१०० अंशांनी मोठी पडझड झाली आहे. या आधी ३० एप्रिलच्या एका दिवशी कराचीतील निर्देशांक ३,५४५ अंशांनी घसरला. ही घसऱण ३.५ टक्क्यांची होती. भारत पाकिस्तानवर हल्ला करेल या भीतीने बाजार कोसळला होता. पण, तसं घडलं नाही आणि भारत अजूनही राजनयिक मार्गच तपासून पाहत असल्याचं पाहून २ मे ला बाजार पुन्हा २,७८५ अंशांनी वधारलाही. पण, बाजारातील भीती अजूनही कमी झालेली नाही. आणि हे उतार चढावांमुळे लक्षात येतं. (Pakistan Stock Exchange)

६ मे रोजी सुरुवातीला अर्ध्या टक्क्याने वर असलेला कराची निर्देशांक दिवसअखेर ५०० अंशांच्या घसरणीसह १,१३,५६४ अंशांवर बंद झाला आहे. या निर्देशांकाचा सर्वकालीन उच्चांक १,२०,७९६ अंशांचा आहे. अशावेळी दोन प्रश्न उद्भवतात. एकतर पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना निर्देशांक अलीकडे इतका वर कसा गेला? आणि दुसरं म्हणजे आताही युद्धाच्या सावटाखाली तो एकमार्गी खाली का येत नाहीए?

(हेही वाचा – भारतात food license मिळवण्याची प्रक्रिया काय आहे आणि किती पैसे भरावे लागतात? वाचा परिपूर्ण माहिती…)

शेअर बाजार विश्लेषक आरिफ हबीब (Arif Habib) यांनीच या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. त्यांच्यामते अधून मधून होणारी खरेदी ही तांत्रिक आहे. त्याला मूलभूत गुंतवणूक म्हणता येणार नाही. ‘पाकिस्तानी शेअर बाजार मागची तीन वर्षं अतिशय वाईट काळातून गेले आहेत. त्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांकडेच रोख पैसे शिल्लक आहेत. त्या जोरावर ते तात्पुरती खरेदी करताना दिसतात. पण, हे तांत्रिक करेक्शन आहे. यात मूलभूत दीर्घकालीन गुंतणूक झालेली दिसत नाही. म्हणूनच आता पाकिस्तानची (Pakistan) अशी परिस्थिती आहे,’ असं हबीब रॉयटर्सशी बोलताना म्हणाले. (Pakistan Stock Exchange)

तर युद्धाच्या परिस्थितीत पाकिस्तानचे बाजार किती तग धरतील या प्रश्नाला त्यांनी नकारात्मक उत्तर दिलं. ‘सध्या देशात परकीय गुंतवणुकीचं वातावरण नाही. अशावेळी देशी गुंतवणूकदार अस्थिर बाजारात तग धरण्याची शक्यता कमीच आहे. शिवाय युद्धासारख्या परिस्थितीत लोकांचा खरेदीचा विश्वास राहणंही कठीण आहे,’ असं हबीब (Arif Habib) यांनी स्पष्ट केलं.

त्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांनी आणलेला फुगवटा लवकरच फुटणार असल्याची चर्चा आता सुरू आहे. याउलट भारतात युद्धाचं सावट असलं तरी अमेरिकेबरोबरचा व्यापारी करार दृष्टिपथात आहे. त्यामुळे भारत – पाकिस्तान तणावाचा दीर्घकालीन परिणाम भारतीय शेअर बाजारावर जाणवण्याची शक्यता नाही. पाकिस्तान मात्र प्रत्यक्ष युद्धापूर्वीच एकेक आघाड्यांवर चितपट होत असल्याचं चित्र आहे. (Pakistan Stock Exchange)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.