-
ऋजुता लुकतुके
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रतिहल्ला सुरू केल्यानंतर मागचे काही दिवस पाकिस्तानातील शेअर बाजार कोसळताना दिसत आहेत. त्यातच गुरुवारी कराची शेअर बाजारात इतकी घसरण झाली की, काही काळ बाजारातील व्यवहार थांबवावे लागले. अखेर दिवस संपताना कराची १०० निर्देशांक साडेपाच टक्के किंवा ६,४८२ अंशांनी घसरून १,०३,५२६ अंशांवर बंद झाला. (Pakistan Stock Exchange)
केएसई १०० निर्देशांक सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा जवळ जवळ ८ टक्क्यांची घसरण दिसून आली होती. पाकिस्तानातील टॉपलाईन सिक्युरीटीज या ब्रोकरेज फर्मनं पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये गेल्या ९ व्यापार सत्रात ४.१ टक्के घसरण झाल्याचं म्हटलं. केएसई १०० निर्देशांक मंगळवारी देखील घसरला होता. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडून व्याज दरात कपात करण्यात आल्यानंतर देखील शेअर बाजारात घसरण झाली. मंगळवारी पाकिस्तानचा शेअर बाजार ५३३.७३ अंकांनी घसरला होता. (Pakistan Stock Exchange)
(हेही वाचा – पाकिस्तानच्या लष्कर अधिकाऱ्यांनी मागितला लष्करप्रमुख Asim Munir यांचा राजीनामा; पाकचे लष्कर बुडाले सत्ता संघर्षात)
भारतीय सुरक्षा दलांनी संयुक्तपणे ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील ९ ठिकाणांवर हवाई हल्ले केले. भारतानं पाकिस्तानच्या एअर स्पेसमध्ये न जाता हे हल्ले केले आहेत. पहलगाम मध्ये २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. त्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये २५ भारतीय आणि १ नेपाळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. (Pakistan Stock Exchange)
केएसई १०० निर्देशांक पुलवामा दहशतवादी हल्ल्यावेळी २ टक्क्यांनी घसरला होता. तर, त्यानंतर बालाकोटमध्ये भारतानं एअर स्ट्राईक केला होता त्यावेळी केएसई १०० निर्देशांक १.४ टक्क्यांनी घसरला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटवर विपरीत परिणाम झाला आहे. पाकिस्तानच्या आर्थिक अस्थिरतेमुळं स्टॉक मार्केट केएसई १०० निर्देशांकात घसरण सुरु आहे. (Pakistan Stock Exchange)
(हेही वाचा – Rohit Sharma Retires : रोहित शर्माचा वारसदार कोण? माजी कसोटीपटूने सुचवलं ‘हे’ नाव)
पण, यंदा झालेली घसरण ही सातत्यपूर्ण आणि मोठी आहे. २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भारतीय कारवाईच्या शक्यतेनं घबराहट पसरली आहे. परिणामस्वरुप शेअर बाजारातही १० टक्क्यांहून जास्त एकूण घसरण झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष युद्धापूर्वीच पाकिस्तानचा आर्थिक युद्धात पराभव झाल्याचं दिसत आहे. (Pakistan Stock Exchange)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community