पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांचे संबंध पुन्हा जगासमोर आले आहे. पाकिस्तानच्या कराची आणि लाहोर या दोन मोठ्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत, या पोस्टरवर फील्ड मार्शल आसिम मुनीर (Asim Munir) यांचा फोटो पाकिस्तानमधील काही दहशतवाद्यांसोबत छापण्यात आला आहे. सध्या पाकिस्तानमध्ये या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान ही पहिलीच वेळ नाही की, पाकिस्तानचे लष्कर आणि दहशतवाद्यांचा संबंध जगासमोर आला आहे, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवले. त्यामध्ये दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, तसेच १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्या वेळी देखील दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पाकिस्तानचे अनेक बडे सैन्याधिकारी सहभागी झाले होते. आता समोर आलेल्या पोस्टरमुळे हे वास्तव पुन्हा समोर आले आहे.
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराचे चार ते पाच उच्च अधिकारी देखील पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्तानी लष्कराकडून दहशतवाद्यांना पाठिंबा दिला जात असल्याचे पाकिस्तान लष्करातील माजी अधिकारी आदिल राजा यांनी एका व्हिडिओत म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानमधील लष्करातील माजी अधिकाऱ्याचा हा खळबळजनक खुलासा समोर आल्याने चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
आदिल राजा यांनी काय केले खुलासे?
- पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना पाठिंबा देते.
- पाकिस्तान त्यांच्या हँडलर्सद्वारे भारतात हल्ले घडवून आणतो.
- पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचा हात
- मुनीर आपले पद वाचवण्यासाठी काहीतरी मोठे करू इच्छित होता.
- आपले पद वाचवण्यासाठीच असीम मुनीरने (Asim Munir) पहलगाम हल्ला घडवून आणला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community