-
प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत शिवसेनेने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाकिस्तानी उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला, त्यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. (Pahalgam Terrorist Attack)
(हेही वाचा – Water Cut : मुंबईतील ‘या’ भागात येत्या शनिवार आणि रविवारी राहणार पाणीकपात; काय आहे कारण?)
शिवसेनेचे राहूल कनाल यांनी २३ मार्च २०२५ रोजी राज्यपालांना पत्र लिहून ही मागणी केली. पत्रात कनाल यांनी लिहिले की, “पहलगाम हल्ला अमानवीय आणि निंदनीय आहे. दहशतवादाचा हा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्र सरकारने पाकिस्तानी उत्पादनांवर बंदी घालून आणि त्यांच्या चित्रपट-मालिकांचे प्रसारण थांबवून कठोर भूमिका घ्यावी. हे केवळ प्रतीकात्मक पाऊल नसून, दहशतवादाला आर्थिक पाठबळ देणाऱ्या संस्थांना आळा घालण्यासाठी आवश्यक आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, “पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूड प्रकल्पांमध्ये सहभागी करू नये, जेणेकरून त्यांचा सांस्कृतिक प्रभाव आणि भारतविरोधी भावना वाढणार नाहीत.” (Pahalgam Terrorist Attack)
(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तान नष्ट केल्यानंतरच दहशतवाद थांबेल; हेमंत महाजन यांनी केले हल्ल्याचे विश्लेषण)
कनाल यांनी या कृतीमुळे महाराष्ट्र इतर राज्यांसाठी उदाहरण ठरेल आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्याचा संदेश जाईल, असे मत व्यक्त केले. त्यांनी राज्यपालांना तातडीने कारवाई करून जनतेच्या भावनांचा विचार करण्याचे आवाहन केले. पत्रात नमूद केलेल्या मागण्यांमुळे दहशतवादाविरुद्ध ठोस पावले उचलण्याचा दबाव सरकारवर वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील पर्यटनाला मोठा धक्का बसला असून, केंद्र सरकारनेही कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. (Pahalgam Terrorist Attack)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community