Pahalgam Terrorist Attack : काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाइन; मृतदेह मुंबईत आणणार

51
Pahalgam Terrorist Attack : काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाइन; मृतदेह मुंबईत आणणार
  • प्रतिनिधी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी राज्य सरकारने मदत कार्य हाती घेतले आहे. मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने 022-22027990 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. हा कक्ष 24×7 कार्यरत असून, अडकलेले पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. (Pahalgam Terrorist Attack)

या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह बुधवारी श्रीनगरहून मुंबईत आणले जाणार आहेत. दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्र आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर पोहोचतील. तेथून ॲम्बुलन्सद्वारे हे मृतदेह त्यांच्या गावी पाठवले जातील. यासाठी राज्य सरकार सर्व प्रकारची मदत करत आहे. हल्ल्यात महाराष्ट्रातील दिलीप डिसले आणि अतुल मोने या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला, तर माणिक पटेल आणि एस. भालचंद्रराव जखमी झाले आहेत. (Pahalgam Terrorist Attack)

(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीर दहशतवादी हल्ला; राज्यातील ६ जणांचा मृत्यू)

श्रीनगरमध्येही मदत कक्ष

श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांसाठी 24×7 आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543 आणि व्हॉट्सअॅप क्रमांक 7006058623, 7780805144, 7780938397 उपलब्ध आहेत. या क्रमांकांवर पर्यटक आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधू शकतात. (Pahalgam Terrorist Attack)

हल्ल्यामुळे पहलगाम परिसरात भीतीचे वातावरण असून, अनेक पर्यटक अडकले आहेत. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा दलांनी परिसर सील करून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. (Pahalgam Terrorist Attack)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.