
प्रतिनिधी
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. श्रीनगरमध्ये अडकलेल्या कुलकर्णी कुटुंबाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर यांच्या फोनद्वारे संवाद साधला. एका खाजगी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून कुलकर्णी कुटुंबाने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर शिंदे यांनी तत्काळ दरेकर यांना पाठवून या कुटुंबाशी संपर्क करवला. (Pahalgam Terrorist Attack)
(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : पहलगाम दुर्घटनेमधील महाराष्ट्रातील चार पार्थिव मुंबईकडे रवाना)
संवादादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी कुलकर्णी कुटुंबासह त्यांच्या सहकाऱ्यांची विचारपूस केली आणि त्यांना लवकरात लवकर मुंबईत परत आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे आश्वासन दिले. “तुम्हाला सुखरूप घरी आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असे शिंदे यांनी सांगून त्यांना धीर दिला. दरेकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पथक श्रीनगरमध्ये दाखल झाले असून, अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आहे. (Pahalgam Terrorist Attack)
(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाइन; मृतदेह मुंबईत आणणार)
हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून, लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने जबाबदारी स्वीकारली आहे. एकूण २६ जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. श्रीनगरमधील नाजूक परिस्थितीमुळे पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या या पुढाकारामुळे अडकलेल्या पर्यटकांना दिलासा मिळाला असून, लवकरच त्यांना घरी आणण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. (Pahalgam Terrorist Attack)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=SOTg1X3NuSY
Join Our WhatsApp Community