Pahalgam Terrorist Attack नंतर सामाजिक माध्यमांवर धर्मांधांनी गाठली असंवेदनशीलतेची परिसीमा

Pahalgam Terrorist Attack : काही सोशल मिडिया अकाऊंटवरून धर्मांधांच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांची खिल्ली उडवली जात आहे.

283

काश्मीरमधील (Kashmir Terror Attack) पहलगाम येथे २२ एप्रिल या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सामाजिक माध्यमांवर तीव्र पडसाद दिसत आहेत. एकीकडे धर्म विचारून, कलमा वाचायला लावून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधात मोठा रोष वाढत आहे, तर काही सोशल मिडिया (social media) अकाऊंटवरून धर्मांधांच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांची खिल्ली उडवली जात आहे. यात धर्मांध मुसलमानांनी असंवेदनशीलतेची परिसीमा गाठल्याचे दिसून आले आहे. (Pahalgam Terrorist Attack )

(हेही वाचा – पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या पहलगाममध्ये भयाण शांतता ; Pahalgam Terrorist Attack ची ह्रदय पिळवटून टाकणारी दृश्य समोर !)

भोपाळ (Bhopal) येथील झिशान खानने पहलगाम हल्ल्याला बळी पडलेल्या नौदल अधिकाऱ्याच्या शेजारी सुन्न बसलेल्या पत्नीच्या फोटोवर मिम बनवले आहे. पहलगाम हल्ल्याच्या दिवशीच आयपीएल क्रिकेट मॅच होती. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा संघ कधीही जिंकलेला नाही. याचा संदर्भ घेऊन झिशान खानने तिच्या त्या हृदयद्रावक फोटोवर ‘उठ जाओ, आरसीबीने फायनल जीत ली’, असे म्हणून खिल्ली उडवली आहे. या मीमवर सामाजिक माध्यमांवर प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

कासिम या X अकाऊंटवर ऊर्दू भाषेत ट्वीट करण्यात आले आहेत. या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, धन्यवाद पाकिस्तान, धन्यवाद लष्कर तैय्यबा, अल्लाह तुम्हाला नेहमीच सुरक्षित ठेवो, आमीन मग आमीन. तुम्ही जर बीजेपी, बजरंग दल, गोदी मीडियाला तुमचे खास लक्ष्य बनवल्यास आम्हाला अधिक आनंद होईल.’, असे म्हटले आहे.

काही सामाजिक माध्यमांवर या हल्ल्यातील पीडितांची छायाचित्रे घिबली आर्टप्रमाणे बनवण्यात आली आहेत.

दहशतवाद्यांनी आमचे नाव विचारून, धर्म विचारून, कलमा वाचालया सांगून ह्त्या केली, हे पीडितच उघडपणे सांगत असतांना काही जण त्यावरही प्रश्न उपस्थित करत आहेत. नेहा सिंग राठोड यांनीही धर्म विचारून मारले, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

एकूणच देशावरील आणि निरपराध्यांवरील हल्ल्याच्या संवेदनशील स्थितीतही टिंगल करणे सुरुच आहे. यातही धर्मांधांच पुढे आहेत. (Pahalgam Terrorist Attack )

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.