भारत सरकारने सोमवार, २८ एप्रिल या दिवशी १७ पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर (YouTube channel) बंदी घातली. यामध्ये क्रिकेटपटू शोएब अख्तर, डॉन न्यूज, समा टीव्ही आणि जिओ न्यूज यांचा समावेश आहे. सरकारचे म्हणणे आहे की, हे चॅनेल भारत आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या चालवत आहेत. (Pahalgam Terror Attack)
(हेही वाचा – Pahalgam Attack Update: पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रेल्वेच्या सुरक्षेत वाढ)
गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर सरकारने ही कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्यात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राजनाथ सिंह पंतप्रधानांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. दुसरीकडे जम्मू-काश्मीर विधानसभेतही (Jammu and Kashmir Legislative Assembly) विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आणि पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करून २६ पर्यटकांची हत्या केली. सुरक्षा दलांकडून खोऱ्यात शोध मोहीम सुरू आहे. (Pahalgam Terror Attack)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community