Pahalgam Terror Update : भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे पंजाबमध्ये हाय अलर्ट, सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम करणार तैनात

55

Pahalgam Terror Update : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंजाब सरकारने (Punjab Govt) राज्याला लागून असलेल्या सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टम (Anti-drone system) तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे. (Pahalgam Terror Update)

अँटी-ड्रोन सिस्टम (Panjab Anti-drone system) तैनात केल्यानंतर, पाकिस्तानकडून येणाऱ्या ड्रोनद्वारे शस्त्रे आणि ड्रग्ज पाठवण्याचा कट अयशस्वी होईल. या तंत्रज्ञानामुळे पोलीस आणि सुरक्षा संस्था पाकिस्तानी ड्रोन तात्काळ शोधून नष्ट करू शकतील. पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “पंजाब सरकार पंजाबला लागून असलेल्या पाकिस्तानी सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टम तैनात करेल. त्यामुळे पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे शस्त्रे आणि ड्रग्ज पाठवण्याचा कट अयशस्वी होईल.

तसेच ड्रोन पाडण्यासाठी अँटी-ड्रोन सिस्टम तैनात केले जातील. या तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलीस आणि सुरक्षा एजन्सी पाकिस्तानी ड्रोनच्या घुसखोरीचा तात्काळ मागोवा घेऊ शकतील आणि नष्ट करू शकतील. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam terrorists attacked), गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. पाकिस्तानी लष्कराने 29 एप्रिलच्या मध्यरात्री जम्मू आणि काश्मीरच्या अनेक सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील (एलओसी) त्यांच्या चौक्यांवरून विनाकारण गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय सैन्याने (Indian Army) चोख प्रत्युत्तर दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.