Pahalgam Terror Update: पाकिस्तानने वाघा बॉर्डरचे दरवाजे उघडले; देशात अडकलेल्या पाक नागरिकांना मायदेशी परतण्याची दिली परवानगी

77
Pahalgam Terror Update: पाकिस्तानमधील अटारी-वाघा बॉर्डरचे दरवाजे पुन्हा उघडले; फक्त ‘या’ व्यक्तींना दिला प्रवेश
Pahalgam Terror Update: पाकिस्तानमधील अटारी-वाघा बॉर्डरचे दरवाजे पुन्हा उघडले; फक्त ‘या’ व्यक्तींना दिला प्रवेश

Pahalgam Terror Update : जम्मू काश्मीर येथिल पहलगाम (Pahalgam terrorist attack) येथे २२ एप्रिलला आतंकवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. त्यामुळे या आतंकवादी हल्ल्यामुळे भारत आणि शेजारील राष्ट्र पाकिस्तानचे संबंध तणावग्रस्त झाले आहेत. अशातच भारत देशांनी पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासात भारत देश सोडण्याचे आदेश दिले होते. यामध्ये भारत देशांनी पाकिस्तानसाठी सिंधू पाणी करार रद्द (Indus Water Treaty cancelled) केला. तर पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासात भारत देश सोडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, अटारी-वाघा सीमेवरील बंद दरवाजे अखेर खुले झाले आहेत. पाकिस्तान सरकारने शुक्रवारी हा निर्णय घेतला असून, भारतात अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Pahalgam Terror Update)

(हेही वाचा – Gold Rate Fall : सोन्याचे दर आणखी २७,००० रुपयांनी घसरणार? जागतिक कंपनीचा दावा)

स्वत:च्या नागरीकांना घेण्यास नकार 
तसेच यामध्ये, सार्क व्हिसा असलेल्यांना २६ एप्रिलपर्यंत, वैद्यकीय व्हिसावरील नागरिकांना २९ एप्रिलपर्यंत तर १२ प्रवर्गातील व्हिसाधारकांसाठी गेल्या आठवड्यात रविवारची मुदत होती. त्यात आगमनानंतर व्हिसा, व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, ट्रान्झिट, परिषद, गिर्यारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, गट पर्यटक, यात्रेकरू आणि गट यात्रेकरू यांचा समावेश आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे गुरुवारी पाकिस्तानने स्वतःच्या नागरिकांना घेण्यास नकार देत अटारी बॉर्डरचे दरवाजे बंद केले होते. शुक्रवारी भारतात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परतण्याची परवानगी देऊन पाकिस्तानने अटारी-वाघा सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले. पाकिस्तानमध्ये सुमारे २४ तास शांतता पाळल्यानंतर हे पाऊल उचलले गेले. गुरुवारी सीमा बंद राहिली, ज्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक भारतीय बाजूला अडकले होते.

(हेही वाचा – National Herald प्रकरणी न्यायालयाने सोनिया-राहुल गांधी-सॅम पित्रोदा यांना बजावली नोटीस)

अटारी-वाघा सीमेवरून ९११ जणांना पाकिस्तानात पाठवले
भारताने निवडक व्हिसा श्रेणी रद्द करण्याची घोषणा केल्यापासून, बुधवारी १२५ पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानात गेले. ज्यामुळे सात दिवसांमध्ये बाहेर पडणाऱ्यांची संख्या ९११ झाली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.