Pahalgam Terror Update : सिंधू पाणी करारानंतर भारताचा आणखी एक ‘वॉटर स्ट्राइक’; आता ‘या’ धरणातून रोखला पाणीप्रवाह

63

Pahalgam Terror Update : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत. पाकिस्तानसोबतचा 65 वर्षे जुना सिंधू करार रद्द (Indus Water Treaty suspended) करणे, हा पाकिस्तानला अद्दल शिकवण्यासाठी भारताने उचललेले हे सर्वात मोठे पाऊल मानले जात आहे. दरम्यान, आता भारत सरकारने चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा विसर्ग (Water from Baglihar Dam stopped) थांबवला आहे. तसेच झेलम नदीवरील (Kishanganga Dam water stopped) थांबवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. (Pahalgam Terror Update)

(हेही वाचा – India-Pakistan War : पाकिस्तानच्या संकटात पडली आणखी भर, थेट शहरचं घेतलं ताब्यात)

किशनगंगेचे पाणी थांबवले जाणार?
मीडिया रिपोर्सनुसार, भारत जम्मूतील रामबन येथील बगलिहार जलविद्युत धरण आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा जलविद्युत धरणाद्वारे आपल्या बाजूने पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचे नियमन करू शकतो. याचा अर्थ असा की, या धरणांद्वारे पाकिस्तानला जाणारे पाणी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय थांबवता येते किंवा प्रवाह वाढवता येतो. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दशकांपूर्वीचा हा करार स्थगित केला आहे.

दोन दशके जुना करार स्थगित
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दशकांपूर्वीचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. या हल्ल्यात २६ लोक ठार झाले, त्यापैकी बहुतेक पर्यटक होते. १९६० पासून भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याचा वापर जागतिक बँकेच्या मध्यस्थीने केलेल्या सिंधू जल कराराद्वारे नियंत्रित केला जात आहे.

बागलिहार धरण बऱ्याच काळापासून वादात
बागलिहार धरण हा दोन्ही शेजाऱ्यांमधील दीर्घकाळापासून वादाचा विषय आहे. या प्रकरणात पाकिस्तानने जागतिक बँकेची मध्यस्थी मागितली आहे. किशनगंगा धरणावर पाकिस्तानचाही आक्षेप आहे, विशेषतः झेलमची उपनदी असलेल्या नीलम नदीवर त्याचा परिणाम होत असल्याने. याआधीही पाकिस्तानविरुद्ध कारवाईबाबत दिल्लीत खळबळ उडाली आहे.

(हेही वाचा – Ramban Indian Army Accident : जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याचे वाहन दरीत कोसळले ; ३ जवान हुतात्मा)

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) हवाई दल प्रमुख एअर मार्शल एपी सिंग यांची भेट घेतली. याआधी पंतप्रधान मोदींनी नौदल प्रमुखांचीही भेट घेतली होती. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल देखील उपस्थित होते.

हेही पहा –


 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.