Pahalgam Terror Attack : न्यू यॉर्क टाईम्सचा भारतद्वेष उघड; पहलगाम हल्ल्याला म्हटले गोळीबार

106

Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे वृत्तांकन करतांना न्यू यॉर्क टाईम्सने (The New York Times) या घटनेचे वृत्तांकन गोळीबार असे केले आहे. अमेरिकेच्या हाऊस कमिटीनेला फटकारले आहे. या हल्ल्यात इस्लामप्रती निष्ठा सिद्ध करण्यास सांगितले असता एका परदेशी नागरिकासह २६ जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

(हेही वाचा – बेजबाबदार विधाने करू नका; वीर सावरकर अवमानप्रकरणी Rahul Gandhi यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले)

या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी गट द रेझिस्टन्स फ्रंटने घेतली आहे. ती बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबाची (Lashkar-e-Taiba) शाखा आहे. न्यू यॉर्क टाईम्सने या हल्ल्याचे वर्णन गोळीबार असे केले आहे.

अमेरिका सरकारच्या परराष्ट्र व्यवहार समितीने न्यू यॉर्क टाईम्सच्या बातमीचा स्क्रीन शॉट पोस्ट करून त्याला अवास्तव असे म्हटले आहे. ‘काश्मीरमध्ये २४ पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारले’, अशी न्यू यॉर्क टाइम्सची ठळक बातमी होती. अमेरिकन सरकारने म्हटले आहे की, ‘हा एक दहशतवादी हल्ला होता, अगदी सरळ ! “भारत असो किंवा इस्रायल, जेव्हा दहशतवादाचा प्रश्न येतो, तेव्हा न्यूयॉर्क टाइम्स वास्तवापासून खूप दूर जातो”, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Pahalgam Terror Attack)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.