Pahalgam Terror Attack : भारतीय नौदलाने समुद्रात सुरू केली Destroyer मिसाइल चाचणी

124

Pahalgam Terror Attack : श्रीनगर जवळील पहेलगाम (Pahelgam) येथे पाकपुरस्कृत दहशदवाद्यांनी (Terrorists Attack) निष्पाप २६ भारतीय हिंदूची हत्या केली. दरम्यान भारताने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंधू पाणी करार रद्द (Indus Water Treaty cancelled) करण्यात आला. तसेच ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारतातून बाहेर होण्यास सांगण्यात आले. कायदेशीर व राजकीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी (Pakistan) केल्यानंतर, याचाच एक भाग म्हणून भारतीय नौदलाने एक मोठी कामगिरी सुरू केली आहे. (Pahalgam Terror Attack)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : काश्मीरला फिरायला जाऊ नका; सामाजिक माध्यमांवर का केले जात आहे आवाहन ?)

भारतीय नौदलाची ताकद वाढणार
भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौके INS सुरतने समुद्रात वेगाने उडणाऱ्या आणि लक्ष्यावर अचूक हल्ला करणाऱ्या Destroyer क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. या कामगिरीमुळे नौदलाची ताकद आणखी बळकट झाली आहे. हे यश स्वदेशी युद्धनौकेची रचना, विकास आणि ऑपरेशन्समध्ये भारतीय नौदलाची वाढलेली ताकद दर्शवते. यामुळे संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी भारताचे स्वप्न आणखी सामर्थ्यशाली होत आहे.

(हेही वाचा – Organ Donation ला नवीन दिशा; गरजू रुग्णांना नवजीवन देण्याचा संकल्प)

अरबी समुद्रात केलेली चाचणी महत्त्वाची का?
अरबी समुद्रात Destroyer मिसाइची झालेली यशस्वी चाचणी खूप महत्त्वाची आहे. कारण पाकिस्तान देखील त्याच भागात क्षेपणास्त्राची चाचणी घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या जलद निर्णयांमुळे पाकिस्तान बिथरला आहे. तशातच पाकिस्तान क्षेपणास्त्र चाचणी करणार असून या संदर्भात त्यांनी एक अधिसूचनाही जारी केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.