Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अमेरिका मदत करणार; तुलसी गबार्ड म्हणाल्या, हा इस्लामिक दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack : २६ हिंदूंना लक्ष्य करून झालेल्या भयानक इस्लामिक दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतासोबत एकजुटीने उभे आहोत, असे गबार्ड यांनी म्हटले आहे.

126

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. अमेरिका, रशिया तसेच युरोपीय देशांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत उभे रहाणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक (Director of National Intelligence) तुलसी गबार्ड (DNI Tulsi Gabbard) यांनी या दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे आणि ते भारतासोबत उभे राहतील, असे म्हटले आहे. (Pahalgam Terror Attack)

(हेही वाचा – ‘धार्मिक अधिकारांमध्ये हस्तक्षेप नाही…’ वक्फ कायद्यावर केंद्र सरकारने Supreme Court मध्ये प्रतिज्ञापत्र केले दाखल)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करताना, तुलसी गबार्ड म्हणाल्या की, पहलगाममध्ये २६ हिंदूंना लक्ष्य करून झालेल्या भयानक इस्लामिक दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतासोबत एकजुटीने उभे आहोत. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या प्रार्थना आणि मनापासून संवेदना आहेत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भारतातील सर्व जनतेसोबत आहोत. आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत आणि या भयानक हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना पकडण्यात तुमचे समर्थन करतो.”

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामला भेट देणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. ज्या वेळी ही दहशतवादी घटना घडली, त्या वेळी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स त्यांच्या कुटुंबासह भारत दौऱ्यावर होते. अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पहलगाम हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला आणि पूर्ण पाठिंबा दर्शविला. (Pahalgam Terror Attack)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.