Pahalgam Terror Attack: मंगळवारी २२ एप्रिलला जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या (Terrorist attack) पार्श्वभूमीवर एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि इंडिगो यांनी तिकीट रद्द करणे आणि वेळापत्रक बदलण्याचे शुल्क माफ (Airline service charges waived) केले आहे. अशी माहिती विमान कंपन्यांकडून देण्यात आले आहे. (Pahalgam Terror Attack)
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : हल्ल्याच्या ठिकाणी एकही सैनिक का नव्हता; सामाजिक माध्यमांवर होत आहे चर्चा)
एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि इंडिगो यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले की, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन, आम्ही ३० एप्रिल २०२५ पर्यंत श्रीनगरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या आमच्या फ्लाइट्ससाठी बदल आणि रद्द करण्याचे शुल्क माफ करत आहोत.
याशिवाय, एअर इंडिया (Air India) आणि इंडिगो (indigo) २३ एप्रिल रोजी श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी दोन विशेष उड्डाणे चालवतील. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान सकाळी ११:३० वाजता श्रीनगरहून दिल्लीला रवाना होईल. श्रीनगरहून मुंबईला दुपारी १२:०० वाजता विमान उड्डाण होईल.
दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू मंगळवारी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये मंगळवारी दुपारी २.४५ वाजता झालेल्या या हल्ल्यात २० हून अधिक लोक जखमी झाले.
(हेही वाचा – महसूल अधिकाऱ्यांना Chandrashekhar Bawankule यांचा दम; परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास निलंबन)
हल्ल्याची जबाबदारी ‘या’ संघटनेने स्वीकारली
लष्कर-ए-तैयबाच्या विंग द रेझिस्टन्स फ्रंटने (The Resistance Front) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली लष्कर-ए-तैयबाची शाखा द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गोळीबारानंतर दहशतवादी पळून गेले. पहलगाम हल्ल्यात दोन परदेशी दहशतवादी आणि दोन स्थानिक दहशतवादी सहभागी असल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले. दरम्यान, उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने ठार मारले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community