Pahalgam Attack Update : जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack), भारताने कारवाई केली आणि सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानविरुद्ध इतर अनेक मोठी पावले उचलली. याबद्दल शेजारच्या पाकिस्तानात सध्या भीतीचे वातावरण आहे. भारत आणि पाकमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध () होऊ शकते. यासाठी तीनही दलांना संरक्षण मंत्रालयाने सज्ज होण्यास सांगितले आहे. तसेच युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भारतीय सैन्याला स्वीडननं (Sweden) कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर पुरवलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे. (Pahalgam Attack Update)
(हेही वाचा – Unified Digital Identity System : तुमची सर्व ओळखपत्र एकाच पोर्टलशी जोडणारी अनोखी युनिफाईड डिजिटल आयडेंटिटी प्रणाली काय आहे?)
कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर शत्रूची दाणादाण उडवणार
भारतीय सैन्याला स्वीडनने एक महत्त्वाचा शस्त्र पुरवलं आहे. कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर भारताला देण्यात आलेले आहे. सर्जिकल स्ट्राइक हे कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचरने केली जातात, हे या शस्त्राचे वैशिष्ट्य आहे. स्वीडनच्या साब कंपनीने सर्जिकल स्ट्राइकसाठी भारताला हे शस्त्र पुरवले आहे. साब कंपनीच्या या शस्त्राचा वापर शत्रूचे बंकर आणि दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड नष्ट करण्यासाठी केला जाईल. कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर हे एक अँटी आर्मर शस्त्र आहे. कुठल्याही प्रकारच्या शस्त्राविरोधात हे अँटी आर्मर शस्त्र वापरले जाते. शत्रू कडून रणगाडे किंवा तोफा मैदानात उतरवल्या जातात, तेव्हा त्या उद्ध्वस्त करण्यासाठी प्रामुख्याने या शस्त्राचा वापर केला जातो. आता भारताकडे कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर हे शस्त्र आल्याने लष्कराची ताकद वाढली आहे. तर या शस्त्रामुळे पाकिस्तानची चिंता वाढणार आहे.
(हेही वाचा – Pakistan व्हिसावर भारतात आलेले इफ्तिखार आणि अर्नीशने बनवले बनावट आधार-मतदार कार्ड)
26 राफेल विमानांचा खरेदी करार
तसेच, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यासाठी भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल नौदल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण संरक्षण करार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दिल्लीतील बैठकीत या करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्याचे समजते. या करारामुळे भारतीय नौदलाची सामरिक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नव्या करारामुळे भारताकडे असलेल्या राफेल लढाऊ विमानांची एकूण संख्या आता 62 वर पोहोचणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community