Pahalgam Attack Update : पाकिस्तानचे चार तुकडे होणारच!

120
Pahalgam Attack Update : पाकिस्तानचे चार तुकडे होणारच!
Pahalgam Attack Update : पाकिस्तानचे चार तुकडे होणारच!
  • चंद्रशेखर नेने 

पाकिस्तानचा एकूण भूप्रदेश आहे त्यातील बलुचिस्तान वेगळा करायचा, वरचा खैबर पक्तनु वेगळा करायचा, हे दोन गेले की राहते सिंध आणि पंजाब. सिंधी-पंजाबमध्ये आता गृहयुद्ध पेटलेले आहे. त्यामुळे सिंधी पण वेगळे होणार आहेत, राहतो फक्त पंजाब, त्याला आपण पश्चिम पंजाबी स्थान म्हणूया. त्या पंजाबमध्ये पाणी मिळाले नाही तर ते एकमेकांचे गळे कापणार निश्चित आहे. त्यावेळेला ते भारतात जर शरणार्थी म्हणून आले तर त्यांना अजिबात शरणार्थी म्हणून घ्यायचे नाही. अशावेळी सगळे जग जरी आपल्या विरुद्ध गेले आणि मानवतेचे धडे देऊ लागले तरी ऐकायचे नाही. पहलगाम येथे त्यांनी मानवता दाखवली होती का?

भारताने मुद्दाम जाहीर केले की, आम्ही सिंधू पाणी करार (Indus Waters Treaty) स्थगित केला आहे. म्हणजे हा करार सध्या सुरु नाही. त्यामुळे या करारानुसार वागण्यास भारत आता बांधील नाही. हे ऐकून  पाकिस्तानने आपली नसलेली अक्कल चालवून त्यांनी सिमला करार स्थगित केला. पाकिस्तानला असे वाटले की, सिंधू नदी पाणी करार स्थगित केला तर पाण्याचा तुटवडा निर्माण होईल. पाकिस्तानचे लोक पाण्याच्या एक एका थेंबाला महाग होतील. कारण भारत सगळे पाणी रोखणार आहे, म्हणून पाकिस्तानी पाणी भरून ठेवायला लागले आहेत. पाकिस्तानी आरजू काजमी यांनी सांगितले होते की, लोक त्यांना वर्षभरासाठी पाणी साठवायला सांगत आहेत. पण वर्षभराचं पाणी भरायला त्यांच्याकडे जागा तरी आहे का? पण मोदी सरकार त्यांना वाटते तसे मुळीच वागत नाही.  मोदी सरकारने अचानक झेलम नदीमध्ये (Jhelum River) जास्त पाणी सोडले, झेलम ही नदी भारतामधून पाकिस्तानात  जाते, तेव्हा तथाकथित आझाद काश्मीर आहे जिथे पाकव्याप्त काश्मीर आहे, त्याची राजधानी मुझ्झफर नगर. त्या  मुझफ्फरपूरमध्ये पुराची परिस्थिती आली, कारण झेलम भारतातून पुढे मुजफ्फरपूरला जाते, तिथे किनाऱ्यावरती हे शहर वसलेले आहे. तिथे पूर आला आहे, लोक बुडायला लागले आहेत, मोटारी वाहून जात आहेत. तेथील नागरिकांना काय होते हेच कळत नाही. इकडे भारत पाणी  थांबवणार म्हणाला पण प्रत्यक्षात जास्त पाणी सोडले. भारताने असे सांगितलेले होते की, आम्ही पाणी थांबवू. याआधी जेव्हा जेव्हा जास्त पाणी सोडायचे असेल तर भारत पूर्वसूचना द्यायचा, पण आता भारत यासाठीही बांधील राहिलेला नाही. तर दुसरीकडे भारताने चिनाब नदीचे सगळे पाणी बंद केले. आता  चिनाबच्या काठावर जी गावे आहेत तिथे त्यांना  पाणीच मिळत नाही. एकूणच  पाकिस्तानची  परिस्थिती, पाकिस्तानच्या नागरिकांची  परिस्थिती अधिकाधिक अडचणीची करणे भारताने सुरु केले आहे. (Pahalgam Attack Update)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : केंद्रीय जलशक्ती मंत्री म्हणतात, ‘दहशतवादी हल्ल्याचा बदला…’)

आता हे सुरू केल्यानंतरचे परिणाम कसे होतात तुम्ही बघा. पहिला परिणाम हा झाला की सिंध आणि पंजाब या दोघांमध्ये आता पाण्यासाठी गृहयुद्ध सुरू झाले आहे. एकमेकांचे जीव घेण्यापर्यंत त्यांच्यातील संघर्ष पेटलेला आहे. पाकिस्तानात प्रचंड मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या आहेत, कारण सिंधचं मत आहे की, पंजाब सगळे सिंधू नदीचे पाणी स्वतःच घेतो, त्यांना पाणीच उरत नाही. त्यामुळे सिंधच्या लोकांची शेती पाण्याविना कोरडी पडली आहे. कारण सिंधू नदी जी पाकिस्तानातून वाहते ती  अगोदर पंजाबमध्ये वाहते आणि पंजाबनंतर  पुढे सिंधमध्ये जाते. पंजाबी लोक आधीच सगळे पाणी काढून घेतात, सिंधमधील नागरिकही पाकिस्तानचेच आहेत. सिंधी पाकिस्तानी  म्हणजे आपल्या इथे आलेले शरणार्थींबद्दल मी बोलत नाही. पाकिस्तानामध्ये राहणारे सिंधी मुसलमान, ज्यांचा नेता  बिलावल भुट्टो आहे, आता बिलावल भुट्टो यांच्याकडून आरडाओरडा करायला सुरुवात झाली आहे. पंजाबी नागरिक आमचे पाणी पळवत आहेत. एकाच सरकारात  बिलावल आणि शाहबाज शरीफ दोघेही आहेत, म्हणजे पंजाबचं रिप्रेझेंटेशन आणि सिंध  रिप्रेझेंटेशन एकाच सरकारात आहे, परंतु ते आता एकमेकांचं पाणी पळवत आहेत. हे कमी होते की काय पाकिस्तानात आता दंगली सुरु झाल्या आहेत. पाकिस्तानी सैनिकांनी राजीनामे दिलेले आहेत. कधी ऐकले का की, लढाईची वेळ आली की सैनिकांनी  राजीनामा द्यायचा? (Pahalgam Attack Update)

पाकिस्तानी सैनिक हे एक नंबरचे पळपूटे

आताच्या  घडीला पाकिस्तानातील ५००० सैनिकांनी राजीनामे दिले आहेत, त्यामध्ये अधिकारीही आहेत. काही अधिकारी कुटुंबासह परदेशात पळून  गेलेले आहेत, त्यांचा मुल्ला मुनीर हा सुद्धा गायब झालेला आहे. तो आता  पाकिस्तानात दिसत नाही, बहुतेक तो बायका मुलांना घेऊन तो परदेशात पळून गेला म्हणजे. त्याच्या खुळचट भाषणामुळे पाकिस्तानी सैनिकांनी जी कारवाई  केली, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) केला, त्याच्यानंतर भारत जेव्हा अंगावर आला, तेव्हा तो पळून गेला. पाकिस्तानी सैनिक हे एक नंबरचे पळपूटे सैन्य आहे. कारण हे सैन्य कुठेही लढले नाही, पाकिस्तानी सैन्य बांगलादेशमध्ये लढले नाही, ९३ हजार सैनिकांनी शरणागती पत्करली होती. तिकडे बीएलएच म्हणजे बलूच लिबरेशन आर्मीचे लोक आहेत, त्यांच्यामुळे पाकिस्तानी सैन्य सैरबैर पळत आहेत. भारताकडील लाईन ऑफ कंट्रोलवरील चौक्या सोडूनही पाकिस्तानी सैन्य पळून गेलेले आहे. खैबर पख्तून येथील सीमेवरील चौक्या सोडून पाकिस्तानी सैनिक पळ काढत सुटले आहेत. कारण पाकिस्तानी सैन्य हे सैन्य नाहीच, ती इंडस्ट्री आहे. त्यांना लढाई करायचीच नाही.

(हेही वाचा – राज्यमंत्री Yogesh Kadam यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश)

पाकिस्तान आपल्यावर अणुबॉम्ब (Atomic bomb) टाकेल अशी भीती असते, ती अजिबात खरी नाही, कारण त्यांना माहिती आहे की, त्यांनी अणुबॉम्ब टाकला, तर भारतही टाकेल. त्यांची सगळी मजा बंद होईल, आता मजा चालली आहे. कारण लढाई झाली की पाकिस्तानी सैन्य पळून जायचे हे ठरले आहे. नेहरु जोपर्यंत राज्यावरती होते तोपर्यंत पाकिस्तानी सैन्याला शरणागती मिळत होती, आता शरणागती  मिळणार नाही, म्हणून ते लढणारच नाही. लढाईच्या आधीच पळून जात आहेत, ही घटना  पाकिस्तानात नुकती घडलेली आहे आणि पाकिस्तान सैन्याचे वरिष्ठ अधिकारी प्रचंड नाराज आहेत. कारण मुनीरने एखाद्या मधमाशाच्या पोळ्याला  दगड मारायचा आणि मग माश्या चावल्या म्हणून बोंबलत सुटायचे असा प्रकार केला आहे. बाकीचे लोक म्हणतात की, तुझा खेळ झाला, पण आमचा जीव  जातोय. आम्हाला परदेशी पळून जायला लागत आहे. बहुतेक ते त्या मुनीरला पकडून त्याला  फासावर लटकवतील. कारण पाकिस्तानात जनरलला  पकडले की, त्याला तुरुंगात टाकण्याची पद्धत  नसते, त्याला फासावरच लटकवायचे असते. कारण त्यांची  इच्छा असते की, त्याला त्या ७२ हुरे मिळाव्यात. मुनीर आता येत्या दोन-चार दिवसांत एकतर मरेल किंवा सीनियर अधिकारी हे त्याला मारतील, आता  मुनीर सापडत नाही, कारण तो आपल्या  कुटुंबासह बंकरमध्ये जाऊन लपला आहे, अशा बातम्या आहेत.  (Pahalgam Attack Update)

आता पंचाईत अशी झाली आहे की, एकीकडे भारत सांगतो पाणी रोखणार, दुसरीकडे पूर  आणत आहे. आता भारताने विमानवाहू नौका अरबी समुद्रात उतरवल्या, तिथे अँटीशिप मिसाईलच्या ट्रायल्स आणि  टेस्टिंग सुरु केली. हा  सायकलॉजिकल वारफेअर आहे. आम्ही तुमची  जहाज बंद करून टाकू, तुमची बंदरे बंद करून  टाकू. भारताने बलूच लोकांना मदत केली तर ग्वादर बंदर पाकिस्तानच्या ताब्यात निघेल. पूर्वेकडून भारत दक्षिणेकडून बलुच,  उत्तरेकडून  टीटीपी, तिकडे तालिबान, खैबर पख्तूनचे पठाण हे सगळे पाकिस्तानी सैन्याची चटणी करतील हे निश्चित आहे. पाकिस्तानचा मित्र सौदी अरेबियाचे मोहम्मद बिन सुलतान मोहम्मद बिन सुलेमान जो सध्याचा राजपुत्र आहे, पण त्यांनीही पाकिस्तानची नसबंदी सुरू केली आहे. आता पाकिस्तानचे ९  लाख ९० हजार ८३० जणांचे हज यात्रेला जाण्यासाठी  अर्ज आले होते, त्यांनी त्यातले फक्त २३ हजार ६२० अर्ज मंजूर केलेले आहेत. पाकिस्तानी लोक हजला  म्हणून सौदी अरेबियात जातात आणि गायबच  होतात, ते परत येत नाही. तिथे भीक मागत  राहतात. तिथे भीक मागायचे, पैसे गोळा करायचे आणि इकडे घरी पैसे पाठवायचे किंवा पैसे गोळा करून  ठेवायचे. यामुळेच ४७०० पाकिस्तानी भिकारी परवा सौदी अरेबियाने पाकिस्तानात हाकलून दिले. युनायटेड अरब म्हणजे अबुधाबी आणि दुबई (Dubai) तिथेही तोच प्रकार आहे. पाकिस्तानी जिथे जातात तिथे भीक  मागतात आणि मग भीक मागताना पकडले की म्हणतात आम्हीच काय आमचा प्रधानमंत्रीही  तुमच्याकडे येऊन भीकच मागतो. आमचे राष्ट्रच भिकाऱ्यांचे राष्ट्र आहे, त्याला  भिकारीस्थान हेच नाव जास्त योग्य आहे. (Pahalgam Attack Update)

(हेही वाचा – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा निवडून आल्याबद्दल Anthony Albanese यांचे पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन !)

भिकारीस्थानमध्ये सगळी औषधे  संपलेली आहेत. भारताने सगळे विसा रद्द केले. सगळ्या पाकिस्तानींनी परत जावे, त्यात एक नवीन रॅकेट उघडकीस आले आहे. एका पाकिस्तानी बाईचा इंटरव्ह्यू आला आहे. भारतातील बाईने पाकिस्तानी नागरिकासोबत लग्न केले, दोन पोरही  झाली, मग पुरुष परत पाकिस्तानात गेला, कारण तो सर्वकाळ इथे राहू शकत नाही, ती भारतीय महिला इथेच राहिली. बाळंतपणाचा सगळा  खर्च भारत सरकारच्या कृपेने केला, तिला जेवायला  भारत सरकार ने घातले, भारत सरकार त्यांच्यासाठी सगळं करते, पण मनामध्ये पाकिस्तानचे प्रेम. मग कशाला  पोसायची त्यांची पिलावळ. सगळ्यांना हाकलून  दिले पाहिजे. आता कठोर भूमिका  घेण्याची वेळ आलेली आहे. पाकिस्तानमधली औषधे संपली आहेत. (Pahalgam Attack Update)

भारताची नवी खेळी

आता मुंबईमध्ये एक मोठा सेमिनार चालू आहे. इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडोर म्हणजे भारतापासून युरोपला जायला एक नवीन  रास्ता उघडला जातोय. भारतात मुंबईमधून आणि  मुंद्रा पोर्टमधून  जहाज निघतील, वाढवण  पोर्ट झाले की तिथून निघणारी जहाजे दुबईला जातील. दुबईला त्यांना तिथे रेल्वे लाईन बसवण्याची योजना आहे. दुबईतून रेल्वे लाईन हायफापर्यंत जाईल इस्राईलमधल्या हायफा बंदरात जहाजे लोड केली जातील आणि ती ग्रीसला  जातील. ग्रीसला पिरेस नावाचे प्रचंड  मोठे बंदर आहे. ते बंदर अदानी मॅनेज करतात. हायफा बंदरही अदानी मॅनेज करतात. मुंद्रा बंदर अदानी मॅनेज करतात. त्यामुळे तिथपर्यंत जहाज जाईल आणि तिथून पुढे रशिया आणि युरोपपर्यंत जाईल, असा हा इंडिया- मिडल ईस्ट  युरोप इकॉनॉमिक कॉरिडोर तयार होतोय  आणि हा जेव्हा तयार होईल तेव्हा  इराणचे महत्त्व संपेल. त्यामुळे पूर्ण पश्चिम आशियाला डावलून हा कॉरेडॉर जाईल  आणि आपले अतिशय उत्तम प्रकारचे कार्गो  नेटवर्क तयार होईल. त्याकरताच भारत  एवढे रस्ते बांधतोय. हा भारताला अधिक शक्तीशाली बनवणारा  मार्ग आहे. (Pahalgam Attack Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.