Pahalgam Attack Update: पाक लष्करप्रमुख असीम मुनीर नंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबही देश सोडून पळाले

746

Pahalgam Attack Update : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने कारवाई सुरू केली आहे. यामध्ये सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानविरुद्ध इतर अनेक मोठी पावले उचलली. यामुळे पाकिस्तान देशात भीतीचे वातावरण आहे आणि लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. लोक देश सोडून पळून जाऊ लागले आहेत. तसेच आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Pak Army Chief Asim Munir) यांचे कुटुंब नुकतेच देश सोडून गेले होते. आता त्या पाठोपाठ पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो (PPP Chairman Bilawal Bhutto) यांचे कुटुंब पाकिस्तान सोडून कॅनडाला पळून गेले आहे.  (Pahalgam Attack Update)

(हेही वाचा – महाराष्ट्रातून ताबडतोब चालते व्हा; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा पाकिस्तानी नागरिकांना इशारा)

सिंधू पाणी करार स्थगित (Indus Water Treaty suspended) झाल्यानंतर, संतप्त बिलावलने धमकी दिली होती की, जर पाकिस्तानचे पाणी थांबवले तर रक्ताच्या नद्या वाहतील. या धमकीच्या एक दिवसानंतर, रविवारी सकाळी (२७ एप्रिल २०२५) त्यांच्या कुटुंबातील सदस्य बख्तावर भुट्टो आणि आसिफा भुट्टो पाकिस्तान सोडून कॅनडाला गेल्याची बातमी येत आहे.

अनेक पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना पाठवले परदेशात  

भारत कधीही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानमध्ये आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या सैन्याचे मनोबलही घसरले आहे आणि अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना परदेशात पाठवले आहे. यामध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचाही समावेश आहे. या लोकांनी त्यांच्या कुटुंबियांना खाजगी जेटने ब्रिटन आणि न्यू जर्सीला पाठवल्याचे वृत्त आहे.

तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच भारताने अरबी समुद्रातील आयएनएस सुरत (INS Surat) येथून क्षेपणास्त्राची चाचणी करून पाकिस्तानला कडक संदेश दिला. त्याच वेळी, पंतप्रधान मोदींनी असेही म्हटले की दहशतवाद्यांविरुद्ध आणि त्यांच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई केली जाईल आणि ते जगात कुठेही लपले असले तरी त्यांना शोधून काढले जाईल. 

(हेही वाचा – Pakistan : देशभरातून पाकिस्तानी मायदेशी परतत असताना केरळ मात्र ‘त्या’ तीन पाकड्यांना ठेवून घेणार)

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यार ?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध संतापाचे वातावरण आहे. तसेच देशवासी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (PM Narendra Modi) बदला घेण्याची मागणी करत आहेत. देशातील सर्व राजकीय पक्षही या मुद्द्यावर सरकारच्या पाठीशी उभे आहेत. सरकार कोणतेही पाऊल उचले तरी विरोधी पक्ष त्यांच्यासोबत असल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे. सध्या, सरकारने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे, पाकिस्तानी लोकांचे व्हिसा रद्द केले आहेत आणि त्यांना देशातून हाकलून लावले आहे. तसेच, राजनैतिक संबंध मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.