Pahalgam Attack Update : मुंबईतील १७ पाकिस्तानी नागरिकांनी सोडला भारत देश

107

Pahalgam Attack Update : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तान विरूद्ध कारवाईला सुरूवात केली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे 14 प्रकारच्या व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. तसेच त्यांना तातडीने त्यांच्या मूळ देशात परतण्याचे आदेश दिल्यानंतर आता मुंबई मध्येही मुंबई पोलिसांकडून 17 पाकिस्तानी नागरिकांना शहर सोडण्यासाठी Exit Permits देण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुदतपूर्व सारे पाकिस्तानी नागरिक भारतातून बाहेर पडले असतील याची खात्री करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रत्येक मुख्यमंत्र्याला फोन करून दिल्या आहेत. (Pahalgam Attack Update)

(हेही वाचा – Turkey aid to Pakistan : पाकिस्तानला तुर्कीची मदत; सहा मालवाहू विमाने भरून शस्त्रसामुग्री पाठवली)

पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जायला सांगितले होते. त्यानुसार, सार्क व्हिसा असलेल्यांना २६ एप्रिलपर्यंत भारत सोडून जाण्यास सांगण्यात आले, वैद्यकीय व्हिसावरील नागरिकांना २९ एप्रिलपर्यंत परत जायचे आहे. तर १२ प्रवर्गातील व्हिसाधारकांसाठी रविवारची मुदत होती. त्यात आगमनानंतर व्हिसा, व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, ट्रान्झिट, परिषद, गिर्यारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, गट पर्यटक, यात्रेकरू आणि गट यात्रेकरू यांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) केंद्र सरकारच्या घोषणेनंतर तात्काळ सर्व पाकिस्तानी नागरिकांना नोटीस बजावण्यास सुरूवात केली होती.

(हेही वाचा – Sanatan Sanstha : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा तर सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेचा जागर! – प. पू. स्वामी गोविंददेव गिरि)

दीर्घ मुदतीचा व्हिसा, राजनैतिक किंवा अधिकाऱ्यांसाठी दिला जाणारा व्हिसा असणाऱ्यांना देश सोडून जाण्याच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, अल्पमुदतीच्या व्हिसावरील सर्वाधिक १,००० पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात आहेत. तसेच जवळपास ५,०५० पाकिस्तानी नागरिक दीर्घमुदतीच्या व्हिसावर राज्यात राहात आहेत. मुंबईतही १७ पाकिस्तानी नागरिक होते. कोणीही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता, गायब किंवा हरविलेला नाही. रविवारी किंवा सोमवारी सायंकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले होते.

हेही पहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.