Pahalgam Terror Attack चा मास्टरमाईंड सैफुल्लाचे फूत्कार; म्हणे, ‘मी आता अधिक प्रसिद्ध झालो’

Pahalgam Terror Attack : बुधवारी सैफुल्ला पूर्णपणे आक्रमक आणि चिखावणीखोर भाषणे देतांना दिसला.

149

लष्कर-ए-तोयबाचा (Lashkar-e-Taiba) कमांडर आणि २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या (Pahalgam Terror Attack) सूत्रधारांपैकी एक असलेल्या सैफुल्ला कसुरीने बुधवार, २८ मे या दिवशी लाहोरमध्ये एका रॅलीत भारताविषयी भडकाऊ टिप्पणी केली. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी इतर दहशतवादी कमांडर आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था, आयएसआयच्या अधिकाऱ्यांनी वेढलेल्या कसुरीने पहलगाम हल्ल्यानंतर दर्पोक्ती काढली आहे. आयएयआयच्या रॅलीत “हल्ल्याचा आरोप झाल्यापासून मी अधिक प्रसिद्ध झालो आहे,” असे फूत्कार सैफुल्लाने काढले आहेत.

(हेही वाचा – Ravindra Jadeja : भारतीय संघाच्या कप्तानीवर रवींद्र जडेजाला काय वाटतं?)

“नरेंद्र मोदींना वाटते की, आम्ही गोळ्यांना घाबरणारे आहोत? ही त्यांची चूक आहे,” असे तो म्हणाला.

कसुरीने यापूर्वी दावा केला होता की, पहलगाम हत्याकांडाशी त्याचा कोणताही संबंध नाही. बुधवारी मात्र सैफुल्ला पूर्णपणे आक्रमक आणि चिखावणीखोर भाषणे देतांना दिसला. पाकिस्तानने १९७१ च्या युद्धाचा आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे विभाजन केल्याचा बदला घेतला असल्याचा दावा करत कसुरीने भारताच्या दळणवळण आणि रेल्वेशी संबंधित महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना ‘लक्ष्य’ केल्याबद्दल पाकिस्तानच्या सायबर टीमचे कौतुक केले.

रॅलीदरम्यान त्याने ‘पुढील निवडणुकीत मोदींविरुद्ध उभे राहिल्यास मला पाठिंबा द्याल का ?’, असेही उपस्थितांना विचारले. पहलगाम हल्ल्यापूर्वी पंजाबमधील कंगणपूर लष्करी तळावर कसुरी दिसला होता, जिथे त्याने पाकिस्तानी सैनिकांना चिथावले आणि भारताच्या विरोधात विष ओकले.

हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) सूचनांवरून, कसुरी, तलहा आणि द रेसिस्टन्स फ्रंटचे (The Resistance Front) शेख सज्जाद गुल यांनी पहलगाममध्ये हल्ला करण्यासाठी विखारी आतंकवादी पाठवल्याचे समजते. कसुरी हा यापूर्वी मिल्लत मुस्लिम लीगचा (Millat Muslim League) अध्यक्ष होता, तो जमात-उद-दावाच्या समन्वय समितीचा, लष्करच्या ‘देणगी’ शाखेचाही भाग होता. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी हल्ल्यातील संघटनांनी काश्मीरमधील जिहादला पाठिंबा देण्याच्या नावाखाली निधी गोळा करण्यासाठी सार्वजनिक रॅली तीव्र केल्या आहेत.

पहलगाममधील हत्याकांडाची जबाबदारी यापूर्वी नाकारलेल्या कसुरीने, अमेरिकेने नियुक्त केलेला दहशतवादी तलहा सईद, लष्करप्रमुख हाफिज सईदचा मुलगा, तसेच पंजाब विधानसभेचे अध्यक्ष मलिक अहमद खान यांच्यासोबत व्यासपिठावर भाषणे केली आहेत. यामुळे दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचे पाकिस्तानचे दावे पोकळ असल्याचे समोर आले आहे.

या रॅलीत आतंकवादी तलहा सईदनेही जिहादचे समर्थन केले आहे. “अल्लाहला जिहादमध्ये सहभागी होणारे आवडतात,” असे तो म्हणाला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.