OTT App Buyout : ॲमेझॉन विकत घेणार भारतातील ‘हे’ मनोरंजन ओटीटी ॲप

OTT App Buyout : सध्या हे ओटीटी ॲप टाईम्स इंटरनेटच्या मालकीचं आहे.

95
OTT App Buyout : ॲमेझॉन विकत घेणार भारतातील ‘हे’ मनोरंजन ओटीटी ॲप
  • ऋजुता लुकतुके

अनेक सुपरहिट वेब सीरिजचे स्ट्रिमिंग करणारा ओटीटी प्लॅटफॉर्म दिग्गज कंपनी ॲमेझॉन खरेदी करणार आहे. मागील एक वर्षापासून या ओटीटी प्लॅटफॉर्मची विक्री होणार असल्याची चर्चा होती. अखेर आता याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. दोन कंपन्यांमधील डील फायनल झाल्याचे वृत्त आहे. ॲमेझॉन खरेदी करणार असलेला ओटीटी प्लॅटफॉर्म हा एमएक्स प्लेअर आहे. एमएक्स प्लेअर हा ओटीटी प्लॅटफॉर्म टाइम्स इंटरनेट कंपनीच्या मालकीचा आहे. (OTT App Buyout)

‘मिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, एक वर्षापूर्वी टाइम्स इंटरनेट आणि ॲमेझॉन प्राईममध्ये चर्चा सुरू होती. मात्र, दोन्ही कंपन्यांमध्ये परस्पर सहमती तयार न झाल्याने या डीलची चर्चा मध्येच थांबवण्यात आली होती. एक वर्षापूर्वी टाइम्स इंटरनेटने एमएक्स प्लेअरसाठी ८३० कोटींची मागणी केली होती. तर, ॲमेझॉन ने ५०० कोटींमध्ये करार करण्याची तयारी दर्शवली होती. (OTT App Buyout)

मागील एक वर्षात एमएक्स प्लेअरची अवस्था आणखी बिकट झाली. कर्जाचा बोझा वाढत गेल्याने एमएक्स प्लेअरचे मूल्य एक वर्षाच्या आधीपेक्षाही कमी झाले. समोर आलेल्या माहितीनुसार, एमएक्स प्लेअर हे २,५०० कोटींच्या कर्जाच्या ओझ्याखाली आहे. आता, समोर आलेल्या एका वृत्तानुसार दोन्ही कंपन्यांमध्ये डील पक्की झाली आहे. एमएक्स प्लेअरचे कर्ज आपल्या माथी घेणार नसल्याचे ॲमेझॉन ने स्पष्ट केले आहे. एमएक्स प्लेअरवरील कर्जाची परतफेड टाइम्स इंटरनेटच करणार आहे. या डीलनंतर एमएक्स प्लेअरचे सीनियर मॅनेजमेंट ॲमेझॉन मध्ये सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे. (OTT App Buyout)

(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार; पुन्हा जाळली पोलीस चौकी)

inc42.com नुसार, टाइम्स इंटरनेट मागील काही काळापासून आपली काही ॲप विकली आहेत. मागील वर्षी टाइम्स इंटरनेटने एमएक्स टकाटक, डाईनआऊट, मेन्सएक्सपी, आयदीवा आणि हाईप ही ॲप विकली.

inc42.com च्या बातमीनुसार, ॲमेझॉन ने १०० दशलक्ष डॉलरहून अधिक रुपयांमध्ये हा व्यवहार केला आहे.

एका दक्षिण कोरियाई कंपनीने मीडिया प्लेअर अॅप म्हणून एमएक्स प्लेअरला लाँच केले होते.

टाइम्स इंटरनेटने वर्ष २०१८ मध्ये १००० कोटींनी या अॅपची खरेदी केली.

टाइम्स इंटरनेटने या प्लॅटफॉर्मला ad-supported streaming service साठी पुन्हा लाँच केले.

आपल्याकडे ३०० दशलक्षहून अधिक युजर्स असल्याचा दावा एमएक्स प्लेअरने केला आहे. (OTT App Buyout)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.