-
प्रतिनिधी
भारतीय लष्कराच्या पराक्रमास समर्पित आणि राष्ट्रप्रेमाने भारलेली ‘सिंदूर यात्रा’ मंगळवार, २० मे रोजी मुंबईत पहिल्यांदाच महिलांच्या नेतृत्वात भव्य स्वरूपात पार पडणार आहे. गावदेवी येथील मणी भवन येथून दुपारी ४:३० वाजता यात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा ‘ऑपरेशन सिंदूर’ या दहशतवादविरोधी मोहिमेस समर्पित असून, भारतीय सैन्याच्या शौर्याला महिलांनी दिलेली ही सलामी संपूर्ण राज्यासाठी एक प्रेरणास्रोत ठरणार आहे. (Operation Sindoor)
यात्रेचे नेतृत्व वीरमाता अनुराधा गोरे आणि डॉ. मंजू लोढा या सामाजिक कार्यकर्त्या करणार आहेत. यामध्ये १५०० हून अधिक महिलांचा सहभाग असणार आहे. शहिद जवानांच्या पत्नी, त्यांच्या कुटुंबीय, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्त्या, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवर महिला या यात्रेत सहभागी होणार आहेत. (Operation Sindoor)
(हेही वाचा – Yunus Government : चीनशी जवळीक साधणाऱ्या बांगलादेशला भारताने दिला ६,४१५ कोटींचा धक्का; कसे ते जाणून घ्या)
यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे शौर्य आणि श्रद्धेचे स्त्रीशक्तीमधून साकारलेले दर्शन. “ही यात्रा केवळ एक श्रद्धांजली नाही, तर महिलांचे राष्ट्रप्रेम आणि सैन्याबद्दलची कृतज्ञता यांचे प्रभावी दर्शन आहे,” असे आयोजकांनी स्पष्ट केले. यात्रेच्या समारोपप्रसंगी राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून सैन्याच्या पराक्रमाला मानवंदना देणार आहेत. (Operation Sindoor)
पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय लष्कराने केलेल्या अचूक कारवाईनंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ ही संकल्पना जन्माला आली. त्याच शौर्याचा गौरव म्हणून महिलांनी एकत्र येत ‘सिंदूर यात्रा’चे आयोजन केले आहे. हा उपक्रम केवळ एक यात्रा नाही, तर महिलांच्या राष्ट्रप्रेमाची, सामूहिक कृतज्ञतेची आणि सैन्याच्या पराक्रमाच्या गौरवाची एक शक्तिशाली अभिव्यक्ती ठरणार आहे. (Operation Sindoor)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community