Operation Sindoor : कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील दहशतवादी rauf asghar याचा खात्मा

92
Operation Sindoor : पाकिस्तानमधील बहावलपूरमध्ये भारतीय सैन्याने (Indian Army) केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा मुख्य कमांडर रौफ असगर (Rauf Asghar death) ठार झाला आहे. ही माहिती वरिष्ठ गुप्तचर संस्था आणि भारतीय लष्कराच्या सूत्रांकडून समोर आली आहे. रौफ असगर हा जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मौलाना मसूद अझहरचा (Maulana Masood Azhar) भाऊ होता . बहावलपूरमधील गटाच्या मुख्यालयाला लक्ष्य करून झालेल्या हल्ल्यात अझहरच्या कुटुंबातील १० सदस्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात अझहरच्या जवळच्या ४ जणांसह एकूण १४ जण ठार झाले. (Operation Sindoor)

(हेही वाचा – Pakistan च्या पंतप्रधान आणि अन्य मंत्र्यांचे ‘ते’ सर्व दावे खोटे; भारताने केले FACT Check)

रौफनेच कंदहार हायजॅक (Kandahar plane hijack) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय विमान अपहरण प्रकरणाचा कट रचला होता. डिसेंबर १९९९ मध्ये, इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे आयसी-८१४ (Indian Airlines flight IC-814 hijacked) दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. ते कंधारला नेण्यात आले. विमानातील नागरिकांच्या बदल्यात, भारत सरकारला ५ खूनी दहशतवाद्यांना सोडावे लागले. यामध्ये मसूद अझहरचाही समावेश होता.

पाकिस्तानी लष्करी अधिकारी अंत्यसंस्कारात उपस्थित
भारतीय विमान अपहरणाव्यतिरिक्त, रौफ असगर पठाणकोट दहशतवादी हल्ला आणि भारतीय संसदेवरील हल्ल्यासाठी देखील जबाबदार होता. रौफ असगर यांना बुधवारी बहावलपूरमध्ये दफन करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयचे उच्च अधिकारी उपस्थित होते.
भारतात केलेल्या रक्तरंजित कारवायांमुळे रौफ असगर हा देशातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक होता. २००७ मध्ये त्याने जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल चीफ म्हणून पदभार स्वीकारला आणि भारताविरुद्ध क्रूर कारवाया करण्याचा कट रचला. अहवालानुसार, असगरने वयाच्या २४ व्या वर्षी इंडियन एअरलाइन्सचे विमान अपहरण करण्याचा कट रचला होता.

(हेही वाचा – हे Best झाले; आता प्रवाशांना बसचे Live Location कळणार)

भारताचे ऑपरेशन सिंदूर
बुधवारी रात्री भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये एक मोठी लष्करी कारवाई केली. भारताने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या ९ दहशतवादी तळांना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले होते. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर मुख्यालय देखील समाविष्ट होते. भारतीय सीमेपासून १०० किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात जैशचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर आणि त्याच्या कुटुंबातील १० सदस्यांसह एकूण १४ जण ठार झाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.