भारत-पाकिस्तान सीमेजवळ होणार Operation Sindoor स्मृती उद्यान; ‘या’ राज्याने घेतला पुढाकार

भारत-पाकिस्तान सीमेजवळ याच Operation Sindoor च्या स्मृतीप्रीत्यर्थ गर्द झाडींचे एक उद्यान उभारले जात आहे. या उद्यानाला 'सिंदूर वन' असे नाव देण्यात आलं आहे.

59

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी (Pahalgam Terror Attack) केलेल्या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ७ मे रोजी पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणी असणाऱ्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक (Air Strike) केला. त्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) या सर्व घडामोडींनंतर आता भारत-पाकिस्तान सीमेजवळ याच ऑपरेशन सिंदूरच्या स्मृतीप्रीत्यर्थ गर्द झाडींचे एक उद्यान उभारले जात आहे. या उद्यानाला ‘सिंदूर वन’ असे नाव देण्यात आलं आहे. (Operation Sindoor Memorial Park)

(हेही वाचा – दहशतवादाच्या विरोधात जागतिक समर्थन मिळवणाऱ्या खासदारांना PM Narendra Modi भेटणार)

गुजरात (Gujarat) सरकार हे उद्यान तयार करत करणार आहे. हे उद्यान भारत-पाकिस्तान सीमेजवळ (India-Pakistan Border) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात उभारले जाणार आहे. या ठिकाणी सीमेपलीकडून पाकिस्तानी लष्कराने हल्लेदेखील केले होते. येत्या एक ते दीड वर्षात हे स्मृतीस्थळ उद्यान तयार होणार असून उद्यानाचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कसे आहे सिंदूर वन ?

कच्छमधल्या ८ एकर जागेवर गर्द झाडींचं ‘वन कवच’ तयार केलं जाणार आहे. भुज-मांडवी रस्त्यावरील मिर्झापार भागात ही जमीन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील ऑपरेशन सिंदूरनंतर गुजरात दौऱ्यादरम्यान याच ठिकाणी भेट दिली होती, अशी माहिती पटेल यांनी दिली. तसेच, या ठिकाणी पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थदेखील एक विशिष्ट बांधकाम केले जाणार आहे.

सिंदूर वन (Sindoor Van) हे एक थीम बेस्ड मेमोरियल पार्क असेल. इथल्या गर्द झाडीमध्ये औषधी वनस्पती, झुडपे, विविध प्रकारचे वृक्ष यांचा समावेश असेल. या झाडांमध्ये प्रामुख्याने सिंदूरची झाडे असतील”, अशी माहिती कच्छ विभागाचे मुख्य वनअधिकारी संदीप कुमार यांनी दिली. या भागात एकूण ३५ प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्याचा मानस वनविभागाचा असून प्रतीहेक्टर १० हजार वृक्षांची लागवड केली जाईल.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय समाज, आर्मी नौदल, हवाई दल, बीएसएफ आणि इतर यंत्रणांनी दाखवलेल्या एकतेचे प्रतीक म्हणून हे स्मृतीउद्यान उभारण्याचे नियोजन वनविभागाने केले आहे”, अशी प्रतिक्रिया कच्छचे जिल्हाधिकारी आनंद पटेल यांनी दिली आहे. (Operation Sindoor)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.