Operation Sindoor : भारतीय सैन्यदलाने यशस्वीरित्या पार पाडलेल्या ‘Operation Sindoor’च्या सन्मानार्थ गुरूवार, दि. १५ मे २०२५ रोजी शिवाजी पार्क ओपन जिमनॅशिअम आणि शिवाजी पार्क नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. मीनाताई ठाकरे पुतळा ते शिवाजी पार्क ओपन जिमनॅशिअम अशी तिंरगा यात्रा सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास संपन्न झाली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त सुनील पवार यावेळी उपस्थित होते.
(हेही वाचा पाकचे पंतप्रधान Shahbaz Sharif म्हणाले; आम्ही शांततेसाठी चर्चा करण्यास तयार; भारतानेही जाहीर केली भूमिका )
दरम्यान, शिवाजी पार्क ओपन जिमनॅशिअम आणि शिवाजी पार्क नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या तिरंगा यात्रेत राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यात्रेत श्री समर्थ व्यायाम मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, आजी आजोबा उद्यान (स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्था, श्रीमान भागोजीशेठ कीर स्मृती समिती), छत्रपती शिवाजी महाराज पार्क एएलएम या संस्थांनीदेखील सहभाग नोंदवला.
ऑपरेशन सिंदुर सन्मान यात्रेच्या समारोपात पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या निरपराध भारतीय नागरिकांना आणि सैनिकी कारवाईत हुतात्मा जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्र गीताने करण्यात आला.
Operation Sindoor अंतर्गत भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानातील ०९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले असून १००हून अधिक दहशवाद्यांना ठार केले. भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाई बहावलपूर, मुरीदके या एअरबेसना लक्ष्य करण्यात आले होते. यासंदर्भात तिन्ही सैन्यदलाने पत्रकार परिषद घेत यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली होती.
Join Our WhatsApp Community