“ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंचावली”; केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचा पुनरुच्चार

109
“ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंचावली”; केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचा पुनरुच्चार
  • प्रतिनिधी

मुंबईतील माधवबाग परिसर मंगळवारी भक्ती, परंपरा आणि राष्ट्रीय गौरवाने उजळून निघाला! श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या १५० व्या जयंती महोत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण आणि ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे प्रेरणादायी भाषण, ज्यामध्ये त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा गौरव करताना महिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारच्या कटिबद्धतेचे ठळक दर्शन घडवले. “आज संपूर्ण जगाला ‘सिंदूर’ या शब्दाचा अर्थ समजला आहे. भारत आता त्या शक्तिशाली भूमिकेत आहे, जो माता भगिनींच्या कपाळावरील सिंदूर पुसणाऱ्यांना त्यांच्या घरात घुसून उत्तर देतो,” असे ते ठामपणे म्हणाले.

(हेही वाचा – US Tariff War : ट्रम्प युरोपियन देशांवर लावणार ६५ टक्के आयात शुल्क; हे शुल्क भारताच्या पथ्यावर?)

मंदिराच्या गौरवशाली परंपरेचे कौतुक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी १५० वर्षे अखंड समाजसेवेचे कार्य बजावणाऱ्या माधवबाग परिवाराचे विशेष अभिनंदन करत पुढील काळात मातृभाषा प्रशिक्षण, धर्मशिक्षण आणि आरोग्य सेवा केंद्र मंदिर परिसरात सुरू व्हावेत, अशी सूचनाही केली.

मुख्यमंत्र्यांचा गौरवपूर्ण अभिमान

या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिराच्या आध्यात्मिक आणि सामाजिक योगदानावर भर देत म्हटले, “या मंदिरात केवळ मूर्ती नसून देवतेचे प्रत्यक्ष वास्तव्य आहे. इथून सुरू झालेली सेवा ही समाजाच्या प्रत्येक थराला लाभदायक ठरली आहे.”

(हेही वाचा – ‘पाकिस्तानवर भरवसा ठेवता येणार नाही, BSF सज्ज आणि सतर्क’; आयजी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरनंतर…”)

सांस्कृतिक सादरीकरणाने भावनांचे सूर छेडले

कार्यक्रमात संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा संध्या पुरेचा आणि सरफोजी राजे भोसले संस्थेच्या कलावंतांनी भावपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. माधवबाग चॅरिटी ट्रस्ट व मंदिर ट्रस्टतर्फे महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

राजकीय आणि धार्मिक समन्वयाचा संगम

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आणि अनेक मान्यवर उपस्थितीमुळे या उत्सवाला धार्मिकतेबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे स्वरूप लाभले.

(हेही वाचा – Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : खर्‍या अर्थाने झाला ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद !)

एकात्म श्रद्धा आणि गौरवाचा क्षण

श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा १५० वा महोत्सव फक्त एक धार्मिक सोहळा नसून, हा श्रद्धा, सेवा आणि संस्कृतीचा संगम ठरला. “ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत अखंड पोहोचेल,” असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.