Onion : कांदा निर्यात बंदी हटवली; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

200

केंद्र सरकारने कांद्याच्या (Onion) निर्यातीवर बंदी घातली होती. देशांतर्गत उपलब्धता वाढवणे आणि किमती नियंत्रणात राहण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार ३१ मार्चपर्यंत बंदी कायम राहणार होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय मागे घेतला आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली. या निर्णयाची अधिकृत सूचना लवकरच सरकारकडून काढण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निर्यातबंदी उठवली असल्याचे सांगितले जाते. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. महाराष्ट्रातील सरकार आणि भाजपामधील अनेक नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेऊन कांद्यावरील (Onion) निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला आता यश मिळाल्याचे सांगितले जाते.

(हेही वाचा Congress : काँग्रेसला आणखी मोठा धक्का बसणार; मनीष तिवारी भाजपच्या वाटेवर)

कांद्याचे दर गडगडले होते

केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे  (Onion) दर गडगडले होते. त्याचे स्थानिक पातळीवर तीव्र पडसाद उमटले. आंदोलनेही झाली. दुधाला जाहीर केलेले दरही मिळत नाहीत. अन्य कृषि मालाबाबत वेगवेगळ्या अडचणी होत्या. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजीचे वातावरण होते. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी हमीभावाच्या मागणीसाठी आंदोलन करत असताना देशातील विविध भागातील शेतकऱ्यांची नाराजी कमी व्हावी, असा प्रयत्न या निर्णयातून झालेला दिसत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.