India Pak War : पाकिस्तानची शकले पडणार; बलुचिस्तानचा एक तृतीयांश भागावर कब्जा, भ्याड पाक सैन्य चौक्या सोडून पळाले

India Pak War : पाकिस्तान कोंडीत सापडला असताना बलुचिस्तानमध्येही (Balochistan) बंडखोरांनी तोंड वर काढले आहे.

92

भारताच्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानचे तुकडे पडणार हे निश्चित झाले आहे. बलुचिस्तानच्या बलोच लिबरेशन आर्मीने (Balochistan Liberation Army BLA) पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर कब्जा मिळवला आहे. बलोच आर्मीच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले. (India Pak War)

(हेही वाचा – India Pak War : भारताला शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही; अमेरिकेचा हस्तक्षेप करण्यास नकार)

ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) पाकिस्तानच्या कुरापतीला उत्तर देताना भारताने आक्रमक भूमिका घेत पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवादी तळांना लक्ष केले. लष्कर, नौदल आणि वायूदलाने संयुक्त कारवाई करत पाकिस्तानला पुरत केले. त्यामुळे पाकिस्तान कोंडीत सापडला असताना बलुचिस्तानमध्येही (Balochistan) बंडखोरांनी तोंड वर काढले आहे.

बलुचिस्तानच्या बंडखोर बलोच आर्मीने (Balochistan Liberation Army BLA) पाकिस्तानवर गोळीबार केला. त्यामध्ये पाकिस्तानच्या सैन्याचा निभाव लागला नाही. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने चौक्या सोडून पळून गेले. बलुचिस्तानच्या एक तृतीयांश भागावर कब्जा केल्याचा बलोच लिबरल आर्मीने दावा केला आहे. त्यामुळे स्वतंत्र बलुचिस्तानकडे टाकलेले हे एक पाऊल आहे, असे बलोच आर्मीचे म्हणणे आहे.

अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेजवळील भाग बलोच आर्मीच्या ताब्यात गेला आहे. केच, मस्टंग आणि कच्छीमध्ये बलोच आर्मीने पाकिस्तानला पळवले. बलोच आर्मीने पाकिस्तानच्या १४ सैनिकांना ब्लास्ट करून ठार केलं होतं. या आधी ११ मार्च २०२५ मध्ये बलोच आर्मीने जाफर एक्स्प्रेसचेही (Jaffar Express) अपहरण केले होते.

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला भारताचा पाठिंबा

बलोच लोक हे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणच्या काही भागात राहतात. त्यातील बहुतांश भाग हा पाकिस्तानच्या ताब्यात आहे. पाकिस्तानी सैन्याने बंदुकीच्या ताकदीवर बलुचिस्तानचा भाग ताब्यात ठेवला आहे. इथले लोक स्वातंत्र्य बलुचिस्तानची मागणी करत आहेत. त्यासाठी बलोच लिबरेशन आर्मीही स्थापन करण्यात आली आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला भारताचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. (India Pak War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.