Thalassemia : ‘एक पाऊल थायलेसेमिया मुक्तीकडे’ अभियान ८ मे पासून

जनजागृती आणि तपासण्यांवर भर देण्याचे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश

47
Thalassemia : ‘एक पाऊल थायलेसेमिया मुक्तीकडे’ अभियान ८ मे पासून
  • प्रतिनिधी 

थायलेसेमिया (Thalassemia) आजार रोखण्यासाठी जनजागृती आणि तपासण्या महत्त्वाच्या असून, महाराष्ट्राला या आजारापासून मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक पाऊल थायलेसेमिया मुक्तीकडे’ अभियान ८ मे २०२५ पासून सुरू होणार आहे. या अभियानाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व थायलेसेमिया ग्रस्त रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. थायलेसेमिया रुग्णांच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा डॉ. महेंद्र केंद्रे, अवर सचिव अविनाश जाधव, परभणीच्या थायलेसेमिया प्रतिसाद केंद्राचे डॉ. लक्ष्मीकांत पिंपळगावकर आदी उपस्थित होते.

(हेही वाचा – दहशतवादी Hashim Musa निघाला पाकिस्तानी सैन्याचा कमांडो; पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका)

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, थायलेसेमिया (Thalassemia) हा अनुवंशिक आजार असून, याबाबत पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे. यासाठी जनजागृती शिबिरांचे आयोजन करावे आणि आजाराची कारणे व लक्षणांबाबत लोकांना माहिती द्यावी. आशा सेविकांना प्रशिक्षण देऊन त्यांना जनजागृतीसाठी सक्रिय करावे. राज्यात नेमलेल्या विविध विभागांच्या समन्वयकांना या अभियानात सहभागी करावे आणि केलेल्या कामाचा नियमित आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

(हेही वाचा – गुजरात पोलिसांनी Bangladeshi Infiltrators च्या अवैध वस्तीवर चालवला बुलडोझर)

याशिवाय, गरोदर मातांची सिकलसेल आणि थायलेसेमिया (Thalassemia) तपासणीचे नियोजन करावे, सीएसआर फंडासाठी प्रस्ताव तयार करावा, तसेच १०४ टोल-फ्री क्रमांकावर थायलेसेमियाबाबत माहिती आणि समुपदेशन उपलब्ध करून देण्यासाठी संकेतस्थळ विकसित करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. या अभियानामुळे थायलेसेमियाबाबत जनजागृती वाढण्याबरोबरच तपासणी आणि उपचारांना गती मिळेल, ज्यामुळे महाराष्ट्राला थायलेसेमिया मुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.