One Nation One Election : समितीची दिल्लीत पहिली बैठक

बैठकीमध्ये कामाचा आरखडा कसा तयार करायचा यासंदर्भात चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

95
One Nation One Election : समितीची दिल्लीत पहिली बैठक
One Nation One Election : समितीची दिल्लीत पहिली बैठक

‘एक देश, एक निवडणूकी’साठी (One Nation One Election) स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक शनिवारी (२३ सप्टेंबर) रोजी पार पडणार आहे. सकाळी ११ वाजता दिल्लीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या समितीचं अध्यक्षपद माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद  यांच्याकडे सोपवण्यात आलं. दरम्यान या बैठकीमध्ये कामाचा आरखडा कसा तयार करायचा यासंदर्भात चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बैठकीसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल, कायदा सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आलीये. या बैठकीविषयी माहिती देताना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ओडिशामध्ये म्हटलं होतं की, ‘२३ सप्टेंबर रोजी ही बैठक पार पडणार आहे.

यांचा आहे सहभाग?
लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या मुद्द्यावर शिफारशी करण्यासाठी आठ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने २ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली होती. या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही रामनाथ कोविंद यांच्याकडे सोपवण्यात आली. तर या समितीचे सदस्य म्हणून गृहमंत्री अमित शहा, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि एनके सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी हे देखील या समितीचे सदस्य होते, परंतु त्यांनी अलीकडेच शहा यांना लिहिलेल्या पत्रात समितीचा भाग होण्यास नकार दिला. याशिवाय ज्येष्ठ वकील हरीश साळवे, लोकसभेचे माजी सरचिटणीस सुभाष कश्यप आणि संजय कोठारी यांचाही समितीत समावेश आहे.

(हेही वाचा : Nagpur Rain : नागपूर मध्ये पावसाचा हाहाकार, तात्काळ मदत करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रA फडणवीस यांचे आवाहन)

समिती काय काम करणार?
देशात सध्या एक देश, एक निवडणूक लागू करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याच अनुषंगाने ही समिती घटना, लोकप्रतिनिधी कायदा आणि इतर कायद्यांमध्ये किंवा नियमांमध्ये कराव्या लागणाऱ्या सुविधांचे परीक्षण करुन शिफारस करेल. तर एका वेळी निवडणुका घेतल्यास पक्षांतरासारख्या समस्या उद्भवू शकतील का याचे देखील परीक्षण ही समिती करणार आहे. समिती ‘वन नेशन, वन इलेक्शन’ अर्थात देशभरातील सर्व निवडणुका जसं लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा, महापालिका, पंचायत समिती आदी निवडणुका एकाच वेळी घेता येणं शक्य आहे का? याचा अभ्यास आणि पडताळणी करणार आहे. यासाठी ही समिती देशातील सर्व राज्यांचा दौरा करुन याबाबत लोकजागृती तसेच लोकांचं म्हणणं ऐकून घेतील. तसेच विविध राजकीय पक्षांशी देखील ही समिती सल्लामसलत करणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.