Old Pension Scheme : कर्मचारी संपावर ठाम

सर्वच संघटनांनी एकमताने गुरुवारी संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील एकूण १७ लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. बुधवार १३ डिसेंबर रोजी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी कर्मचारी संघटनेसोबत चर्चा केली. मात्र कर्मचारी आपल्या संपाच्या निर्णयावर ठाम राहिले.

223
Old Pension Scheme : कर्मचारी संपावर ठाम

जुनी पेन्शन मुद्द्यावर (Old Pension Scheme) शासकीय कर्मचारी ठाम असून ते आजच्या म्हणजेच गुरुवार १४ डिसेंबरच्या आपल्या संपावर ठाम आहेत. बुधवार १३ डिसेंबर रोजी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी कर्मचारी संघटनेसोबत चर्चा केली. मात्र कर्मचारी आपल्या संपाच्या निर्णयावर ठाम राहिले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेली बैठक अयशस्वी –

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात जुनी पेन्शन (Old Pension Scheme) या मुद्द्यावरून आंदोलन सुरू आहे. अशातच या आंदोलकांनी आता संपाचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवार १३ डिसेंबर रोजी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या कामगारांची एक बैठक बोलावली. मात्र त्या बैठकीत सरकारने ठोस कुठले निर्णय न घेतल्याने कर्मचारी आपल्या संपाच्या निर्णयावर ठाम राहिले आहेत.

(हेही वाचा – संसदेत घुसखोरी करणारी Neelam शेतकरी आंदोलनात होती सहभागी; काँग्रेससाठी मागत होती पाठिंबा)

कर्मचाऱ्यांची मागणी काय ?

राज्य सरकारने जुनी पेन्शनबाबत (Old Pension Scheme) आश्वासन लेखी स्वरूपात द्यावं, किंवा मग अधिवेशनादरम्यान पटलावर हा विषय चर्चेला घेऊन यावर योग्य तोडगा काढण्या संदर्भात निर्णय घ्यावा. अशी कामगारांची मागणी आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Intrusion : गृह खात्याने दिले चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश)

त्यामुळे सर्वच संघटनांनी एकमताने गुरुवारी संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील एकूण १७ लाख कर्मचारी (Old Pension Scheme) या संपात सहभागी होणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.