मावळ (Maval) तालुक्यात मोठी दुर्घटना घडली असून कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात २५ हून अधिक पर्यटक नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना तळेगाव दाभाडे शहराच्या लगत असलेल्या प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे घडली.
(हेही वाचा Iran – Israel War : इराणची नरमाईची भूमिका; चर्चा करण्यास, हल्ले थांबवण्याविषयी दिले संकेत)
रविवार असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होती. याच गर्दीत काही पर्यटक पुलावर थांबले असताना अचानक पूल कोसळला आणि अनेक जण थेट नदीत पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मावळ (Maval) परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान असून बचावकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथक घटनास्थळी रवाना झाले असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेबाबत अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे. (Maval)
Join Our WhatsApp Community