Odisha Accident: ओडिशातील झारसुगुडा येथे भीषण दुर्घटना; महानदीत बोट उलटल्याने महिलेचा मृत्यू, ७ जण बेपत्ता

सध्या घटनास्थळी वेगाने मदत आणि बचावकार्य सुरू आहे. 

112
Odisha Accident: ओडिशातील झारसुगुडा येथे भीषण दुर्घटना; महानदीत बोट उलटल्याने महिलेचा मृत्यू, ७ जण बेपत्ता

ओडिशातील झारसुगुडा येथील महानदीत लहान मुले आणि महिलांसह सुमारे ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर ७ जण बेपत्ता आहेत. दरम्यान, बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृत आणि बेपत्ता व्यक्तिंची ओळख अद्याप पटलेली नाही तसेच बेपत्ता झालेल्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. (Odisha Accident)

ही घटना पाहिलेल्यांनी अशी माहिती दिली आहे की, ही बोट बरगढ जिल्ह्यातील बांधीपली भागातून प्रवाशांना घेऊन जात होती. त्यादरम्यान शारदापुलाजवळ ही घटना घडली. स्थानिक मच्छिमारांनी तात्काळ ३५ प्रवाशांचे प्राण वाचवले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आणखी ७ प्रवाशांची सुटका केली. बोटीतील ७ जण अद्याप बेपत्ता असून शोध मोहीम सुरू आहे, मात्र महानदीच्या जोरदार प्रवाहामुळे बेपत्ता असलेल्यांना शोधणे आव्हानात्मक होत आहे.

नुकसानभरपाईचे आदेश…
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले आहे. या दु:खद घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची रक्कम दिली जाईल, असे ते म्हणाले. सध्या घटनास्थळी वेगाने मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.