October Heat : येत्या दोन दिवसांत उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार

81
October Heat : येत्या दोन दिवसांत उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार

सध्या देशासह राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी सुरु असतांना दुसरीकडे मात्र ऑक्टोबर हिट वाढत आहे. अशातच आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांमध्ये या ऑक्टोबर हिटच्या (October Heat) झळा अधिक तीव्र होणार आहेत. बुधवारपासून म्हणजेच १८ तारखेपासून कमाल तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा तडाखा अधिक बसू शकतो. केवळ मुंबईच नाही, तर देशातही यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान जाणवत असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.

रविवारी (१५ ऑक्टोबर) मुंबईत सांताक्रूझ येथे ३४.६, तर कुलाबा येथे ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. शनिवारपेक्षा कमाल तापमानात किंचित घट होती. मात्र पुन्हा सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत आभाळ ढगाळ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाडा वाढू शकतो. तसेच बुधवार १८ आणि १९ ऑक्टोबर (October Heat) दरम्यान मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा पुन्हा ३५ अंशांपर्यंत पोहोचू शकतो. या काळात आभाळ निरभ्र असेल, अशी माहिती निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.

(हेही वाचा – Vishwa Hindu Parishad : हमासचा एकेक जिहादी ठेचल्याशिवाय थांबू नका – डॉ. सुरेंद्र जैन)

तसेच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच किरकोळ पाऊस पडेल. मात्र त्यानंतर १८ ऑक्टोबरपासून उन्हाच्या झळा (October Heat) अधिक तीव्र होतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.