शुक्रवारीही कोरोना डिस्चार्ज रुग्णांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त

109

शुक्रवारीही कोरोना उपचारांतून बरे झालेल्या म्हणजेच डिस्चार्ज रुग्णांची संख्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त होती. राज्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार २४९ तर डिस्चार्ज रुग्णांची संख्या ४ हजार १८९ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. आठवड्याच्या सुरुवातीला राज्यभरात २५ हजारांच्या संख्येत पोहोचलेली कोरोनाबाधितांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. राज्यात आता २३ हजार ९९६ कोरोनाबाधितांना उपचार दिले जात आहे.

( हेही वाचा : ‘DRDO’ ने तयार केले मानवरहित विमान)

यंदाच्या आठवड्यात दोन हजारांच्या संख्येने एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत घट नोंदवली गेली. हे प्रमाण कायम राहिले तर जुलै महिन्यात कोरोनावाढीचा दर कमी होऊ शकतो, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिली.

राज्यात आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८५ टक्के नोंदवले गेले. शुक्रवारी ४ कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबई दोन, ठाण्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्येही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले. राज्यातील मृत्यूदर १.८५ टक्के एवढा आहे. तर कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचा दर ९.७३ टक्क्यांवर कायम आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या खालावतेय

राज्यभरातील विविध भागांतून कोरोना उपचारांतून रुग्णांना डिस्चार्ज दिला जात असताना मुंबईतील सक्रीय कोरोनाबाधितांच्या संख्येतही आता कमालीची घट नोंदवली जात आहे. मुंबईतील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या आता १३ हजारांवरुन खाली घसरत शुक्रवारी ९ हजार ७१० वर नोंदवली गेली. ठाण्यात सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या ५ हजार १८४, पुण्यात ४ हजार ३८२, रायगडात १ हजार २६७ वर नोंदवली गेली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.