Nuh Violence : हिंदूंच्या शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू

122
Nuh Violence : हिंदूंच्या शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू
Nuh Violence : हिंदूंच्या शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू

हरियाणामधील नूहमध्ये पुन्हा एकदा शोभायात्रा काढण्यावरून विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनी, मुसलमान आणि स्थानिक प्रशासन यांच्यात संघर्ष (Nuh Violence) चालू आहे. प्रशासनाने परवानगी नाकारली असली, तरी शोभायात्रा काढणारच असा निर्धार हिंदू संघटनांनी केली आहे. शोभायात्रा काढू न देण्यासाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवायला प्रारंभ केला असून जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांच्या अधिकाऱ्यांना त्यांचे पोलीस स्टेशन न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विविध भागांमध्ये ड्युटी मॅजिस्ट्रेटची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. नूहचे पोलीस उपायुक्त धीरेंद्र खडगटा यांनी जिल्ह्यात शांतता राखण्याचे सर्व प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट आहे. नूहमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात 29 ऑगस्टच्या रात्री 12 पर्यंत इंटरनेटची सेवा बंद राहणार आहे. तसेच नूहचे पोलीस उपायुक्त धीरेंद्र खडगटा यांनी कलम 144 लागू केले असल्याची माहिती दिली आहे. सध्या तरी जिल्ह्यातील बँका आणि शाळा बंद केलेल्या नाहीत. पण कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाकडून गस्त घालण्यात येत आहे. तसेच वेगवेगळे नियम देखील लावले जात आहेत.

(हेही वाचा – Student Beaten For Writing Jai Shri Ram: फळ्यावर “जय श्री राम” लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण)

हरियाणाच्या मुसलमानबहुल नूहमध्ये 31 जुलैला हिंदू संघटनांनी शोभा यात्रा काढली होती. विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या वतीने काढण्यात आलेली ही जलाभिषेक यात्रेच्या धर्मांध मुसलमानांनी रोखली. त्यामुळे उसळलेल्या हिंसाचारामध्ये 2 होमगार्डचा मृत्यू झाला, तर दहापेक्षा अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यासह सामान्य नागरिकांपैकी ६ जण ठार, तर ८८ जण घायाळ झाले होते. या घटनेनंतर नूहमध्ये कलम 144 लागू करण्यात आले होते. तसेच 2 ऑगस्टपर्यंत इंटरनेटची सेवादेखील बंद करण्यात आली होती. आता हे प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा ही शोभायात्रा काढण्याची घोषणा हिंदू संघटनांनी केली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाने शोभायात्रा न रोखता हिंदूंनी शांततेने काढलेल्या शोभायात्रेला हिंसाचाराचे गालबोट (Nuh Violence) लावणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी हिंदूंची भूमिका आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.