राज्यातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता एसटी पास (ST Monthly Pass) मिळवण्यासाठी एसटी आगाराच्या रांगेत ताटकळत उभं राहावं लागणार नाही! कारण एसटी महामंडळाने आता “एसटी पास थेट शाळेत” ही विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
ही माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना दिली. येत्या १६ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना, लाखो विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी हे पाऊल क्रांतिकारक ठरणार आहे.
(हेही वाचा – जूनच्या अखेरीस Indian Air Force च्या ताफ्यात येणार Mk 1A तेजस जेट लढाऊ विमाने !)
६६.६६% सवलत आणि मोफत पास विद्यार्थिनींसाठी
राज्यातील विद्यार्थ्यांना एसटीने प्रवास करताना ६६.६६% इतकी भव्य सवलत मिळते. म्हणजेच फक्त ३३.३३% रक्कम भरून मासिक पास मिळतो. शिवाय, शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” योजनेअंतर्गत बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींना एसटी पास पूर्णतः मोफत दिला जातो. (ST Monthly Pass)
पण यासाठी आतापर्यंत विद्यार्थ्यांना पास केंद्रावर रांगेत उभं राहावं लागत होतं किंवा गटागटाने आगार कार्यालय गाठावं लागत होतं. हे त्रासदायक आणि वेळखाऊ असल्याने अनेकांचे शैक्षणिक वेळापत्रकही बिघडत होतं.
एसटी कर्मचाऱ्यांकडून थेट शाळेत पास वितरण
मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिलेल्या निर्देशानुसार, शाळा-महाविद्यालयांनी (School-College) आपल्या विद्यार्थ्यांची यादी आगार व्यवस्थापनाकडे दिल्यानंतर, एसटीचे कर्मचारी त्या यादीप्रमाणे थेट शाळेत जाऊन पास वितरित करणार आहेत.
यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून, शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रीत करता येणार आहे. राज्यभरात ही सुविधा लागू करण्यात येणार असल्याने लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे.
(हेही वाचा – Kedarnath Helicopter Crash: केदारनाथच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळले ; ७ जणांचा मृत्यू !)
“एसटी पास थेट तुमच्या शाळेत” – विशेष मोहीम १६ जूनपासून
या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी १६ जून २०२५ पासून सुरु होणार आहे. यासाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य(Principal) यांना एसटी आगार व्यवस्थापकांनी पत्र पाठवून विद्यार्थ्यांच्या यादीसह तयार राहण्यास सांगितले आहे. या निर्णयामुळे शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनात मोठा बदल होणार असून, शासनाचा “विद्यार्थी केंद्रित प्रशासन” या दिशेने एक सकारात्मक टप्पा पार पडला आहे, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केले.
एकूणच, ‘एसटी पास थेट शाळेत’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक मोठे पाऊल ठरत आहे, जो वेळेची बचत, सुलभता आणि शैक्षणिक सोयींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. (ST Monthly Pass)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community