आता दुर्गम भागातही रोबोटिक शस्त्रक्रिया होणार: Tele-Robotic Surgery घराजवळ सुविधा देणार

119

Tele-Robotic Surgery : दुर्गम भागातील रुग्णांना जटिल शस्त्रक्रियांसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. मोबाईल टेली-रोबोटिक सर्जरी (Tele-Robotic Surgery) युनिटच्या माध्यमातून, ज्या भागात सध्या ते शक्य नाही अशा ठिकाणी आधुनिक शस्त्रक्रिया (Modern surgery) सुविधा उपलब्ध करून देता येतील. प्रगत रोबोटिक सिस्टीम आणि सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीच्या मदतीने, डॉक्टर दूरवरूनही शस्त्रक्रिया करू शकतील. हाय-स्पीड टेलिकम्युनिकेशन्समुळे रिअल-टाइममध्ये ऑपरेशन्स शक्य होतील, ज्यामुळे रुग्णांना जलद उपचार मिळू शकतील. (Tele-Robotic Surgery)

भारतातील पहिल्या मोबाइल टेली-रोबोटिक सर्जरी युनिटचे अनावरण नवी दिल्लीत (New Delhi) करण्यात आले. याप्रसंगी एसएस इनोव्हेशन्सचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. सुधीर श्रीवास्तव (Dr. Sudhir Srivastava) म्हणाले की, एसएसआय मंत्राम हे केवळ एक मोबाइल टेलिसर्जिकल युनिट (Mobile Tele Surgical Unit) नाही, तर ते जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेचे लोकशाहीकरण आणि विकेंद्रीकरण करण्याच्या दिशेने एक चळवळ आहे. टेलि-सर्जिकल प्रक्रियांव्यतिरिक्त, एसएसआय मंत्राम सर्जिकल शिक्षण, टेलि-मेंटरिंग आणि रिअल टाइम रुग्ण डेटा विश्लेषणासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ म्हणून काम करते. सतत संशोधन आणि नवोपक्रमासह, एसएसआय प्रगत रोबोटिक शस्त्रक्रिया (Robotic surgery) ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत असल्याचे यावेळी डॉ. श्रीवास्तव म्हणाले.

(हेही वाचा – Sion Hospital मध्ये धक्कादायक प्रकार; डॉक्टरांच्या भांडणात ८७ वर्षीय रुग्ण उपचारांविना २४ तास स्ट्रेचरवर)

दुर्गम भागात सेवा देण्यासाठी डिझाइन केलेले एस एसआय मंत्राम बॅकअप पॉवर सिस्टमसह सुसज्ज आहे. तसेच हाय-स्पीड टेलिकम्युनिकेशन सिस्टम आणि सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीमध्ये (Satellite connectivity surgery) चालू असलेल्या संशोधन आणि विकासासह, युनिटमध्ये अगदी दुर्गम भागात देखील दूरस्थ टेलिरोबोटिक शस्त्रक्रिया सुलभ होणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.