कॅब सेवा देणाऱ्या ओला आणि उबर यांच्या भाड्यातील तफावतीसंदर्भात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणाने (सीसीपीए) दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावली आहे. आयफोन आणि ऍन्ड्रॉईड सारख्या वेगवेगळे स्मार्टफोन वापरताना त्यांना एकाच भाड्यासाठी विविध भाडेदर दाखवले जात असल्याची तक्रार ग्राहकांकडून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर (एक्स) ही माहिती दिली. (Ola-Uber)
(हेही वाचा – Narayan Murthy : ‘७० तास कामाची सक्ती होऊ शकत नाही, मी अनुभव सांगितला’ – नारायण मूर्ती)
यासंदर्भात जोशींनी सांगितले की, ग्राहक व्यवहार विभागाने या समस्येची दखल घेतली असून सीसीपीएला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. काही फोन मॉडेल्सवर भाडे जास्त दाखवले जाते तर काहींवर कमी भाडे दाखवले जाते, असे तक्रारदारांनी सांगितले. ओला आणि उबरला आता त्यांची भाडे निश्चित करण्याची प्रक्रिया आणि या फरकांची कारणे स्पष्ट करण्यास सांगितले आहे. (Ola-Uber)
(हेही वाचा – Republic Day : भारतपर्व महोत्सवात असणार महाराष्ट्राचा ‘मधाचे गाव’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ)
तंत्रज्ञानाशी संबंधित तक्रारीवर सीसीपीएने हस्तक्षेप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच सीसीपीएने ॲपलला देखील नोटीसही बजावली होती. नॅशनल कंझ्युमर हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारींमध्ये, ग्राहकांनी म्हटले होते की, आयओएस 18 किंवा नंतरचे अपडेट केल्यानंतर, त्यांच्या आयफोनला परफॉर्मन्सशी संबंधित समस्या येत आहेत. सीसीपीएने या प्रकरणाची चौकशी करून ॲपलकडून प्रतिक्रिया मागितली आहे. सरकारचा हा उपक्रम डिजिटल प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये न्याय्य व्यवहार सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. सीसीपीएची ही कारवाई ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांचा विश्वास दृढ करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. (Ola-Uber)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community