चतुर्थ आणि तृत्तीय श्रेणीतीलच नव्हे तर BMC च्या इतर कर्मचाऱ्यांनाही माहुलच्या घरांसाठी करता येणार अर्ज

958
MCMCR येथील विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी २० मे २०२५ पर्यंत मुदतवाढ
  • सचिन धानजी, मुंबई 

मुंबई महापालिकेच्या (BMC) कामगार, कर्मचाऱ्यांसाठी माहुलमधील घरांची विक्री करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी याला फारसा प्रतिसाद न लाभल्याने आता याच्या अटींमध्येच बदल करण्यात आला आहे. त्यामुळे चतुर्थ आणि तृत्तीय श्रेणीतीलच कामगार आणि कर्मचारी या घरांसाठी अर्ज करू शकत होते, ही अट बदलून आता श्रेणी एक मधील कर्मचारी वगळता सर्वच संवर्गातील कर्मचारी आणि अधिकारी हे या घरांसाठी अर्ज करू शकणार आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी सोडले तर सर्वांचाच या घरांच्या खरेदीकरता अर्ज करता येणार आहे आणि यासाठी एक महिन्यांचीही मुदत वाढवून १५ मे २०२५ एवढी करण्यात आली आहे. (BMC)

एमएमआरडीएच्या वतीने बांधलेल्या सदनिका महापालिकेला (BMC) विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी हस्तांतरीत केल्या आहेत. माहुल आंबा पाडा येथील एवर स्माईल, एस. जी. केमिकल, व्हिडीओकॉन अतिथी आदी ठिकाणच्या बऱ्याच सदनिक या प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन केल्यानंतर रिक्त आहेत. या सर्व रिक्त सदनिकांची संख्या १३ हजारांच्या आसपासून असून या ठिकाणी कोणीही प्रकल्प बाधित जाण्यास तयार नसल्याने या सदनिका पडून आहेत. या सर्व सदनिकांची विक्री महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना करण्यात येणार आहे. (BMC)

(हेही वाचा – ISRO चे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे निधन !)

याबाबत महापालिका प्रशासनाच्यावतीने जाहिरात प्रकाशित करून केवळ महानगरपालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असेल, असे प्रशासनाने नमुद केले आहे. यासाठी १५ मार्च ते १५ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. परंतु ही तारीख आता १५ मे २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, ही एक महिन्याची मुदतवाढ देतानाच प्रशासनाने आता श्रेणी एक मधील अधिकारी वर्गळता सर्वच संवर्गातील कामगार, कर्मचाऱ्यांना या घरांच्या खरेदीकरता अर्ज करता येईल अशाप्रकारे अटींमध्ये बदल केला आहे. (BMC)

महानगरपालिकेच्या (BMC) तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी मुंबईमध्ये घर उपलब्ध करून, त्यांच्या प्रवासाचा वेळ कमी करणे आणि कामाची क्षमता वाढवणे हे ही योजना राबवण्याचे उद्दिष्ट्य होते, परंतु या संवर्गातील कामगार कर्मचाऱ्यांकडून याला योग्यप्रकारे प्रतिसाद लाभला नाही. आतापर्यंत केवळ २२० कामगारांकडून अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामुळे श्रेणी एक वगळता सर्वच संवर्गांसाठी या घरांच्या खरेदीचा मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे. (BMC)

(हेही वाचा – IPL 2025, RCB vs RR : अखेर घरच्या मैदानावर बंगळुरूचं नशीब पालटलं, रंगतदार सामन्यात राजस्थानचा ११ धावांनी पराभव)

विशेष म्हणजे यामध्ये आता नवीन अटीचाही समावेश करण्यात आला आहे. या सदनिकेचा लाभ घेणारा कर्मचारी जर सेवानिवासस्थानात राहत असेल तर या घराचे वाटप झाल्यानंतर त्यांना सेवानिवास स्थानाची जागा सोडावी लागेल. त्यामुळे बाकी सर्व अटी जुन्याच असून या अटींमध्ये बदल केल्यामुळे काही प्रमाणात प्रतिसाद वाढेल असा विश्वास मालमत्ता विभागाला आहे. पूर्वी मुंबईत राहणाऱ्या किंवा सेवा निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेत भाग घेता येत नव्हता, पण आता अट बदल्यामुळे सेवा निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या घरासाठी अर्ज करता येणार आहे. याबाबत मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आतापर्यंत यासाठी २२० कामगारांचे अर्ज आल्याचे सांगितले. याबाबत विविध कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या सूचनेचा विचार करत तसेच आयुक्तांच्या मंजुरीने याला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे तसेच श्रेणी एक वगळता सर्वच कामगार कर्मचाऱ्यांना या योजनेत सहभागी होवून स्वत:चे मुंबईत घर घेता येईल अशाप्रकारची अट समाविष्ट करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. (BMC)

(हेही वाचा – बेजबाबदार विधाने करू नका; वीर सावरकर अवमानप्रकरणी Rahul Gandhi यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले)

ठिकाण : माहुल, एस. जी. केमिकल व विडीयोकॉन अतिथी

सदनिकेचे क्षेत्रफळ : २२५ चौरस फूट

किंमत : एक सदनिका १२.५ लाख रुपये अधिक मुद्रांक व नोंदणी शुल्क

किंमत : दोन सदनिका २५.०० लाख अधिक मुद्रांक व नोंदणी शुल्क

किती सदनिकांसाठी करू शकतात अर्ज : कर्मचाऱ्यास १ किंवा २ (जोडी) सदनिका विकत घेण्याची मुभा

घरांच्या खरेदीसाठी कोण लाभार्थी : महापालिकेच्या श्रेणी एक वगळता सर्व संवर्गातील कामगार,कर्मचारी

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ मे २०२५

सोडत काढण्याची तारीख : २० मे २०२५ रोजी काढली जाणार आहे

अनामत रक्कम भरण्याची तारीख : २० मे ते ५जून २०२५

आवश्यक सुविधा : पार्किंग, मुंबई पब्लिक स्कूल, मार्केट आणि प्रसुतीगृह

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.