
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात (Rani Baug) आता पेग्विन कक्षाजवळ आंतराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारले जाणार असून घुमटाकार तसेच पदभ्रमण मत्सालयात विविध प्रकारचे मासे न्याहाळता येणार आहे. या मत्स्यालयासाठी अखेर कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह तब्बल ७० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयातील अर्थात राणी बागेतील (Rani Baug) इंटरप्रिटेशन सेंटर इमारतीच्या तळमजल्यावर आंतरराष्ट्रीय मानकानुसार मत्स्यालयाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर याची निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली आहे. विद्यमान प्राणीसंग्रहालयातील जागेची मर्यादा लक्षात घेता, मासे तसेच जलचरांच्या प्रजातींची संख्या वाढवूनच स्थानिक प्रजातींचा संग्रह वाढवता येऊ शकतो. या विचाराने या मत्स्यालयाची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानुसार मागवलेल्या निविदेमध्ये एस. के. एस. कारकाला ही कंपनी पात्र ठरली असून विविध करांसह तब्बल ७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
या कंपनीने कुर्ला नेहरु नगर येथील महापालिका शालेय इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम केले आहे. परंतु या कंपनीने मत्स्यालय बनवणाऱ्या कंपन्यांशी करार केल्यामुळे निविदा अटींमध्ये ही कंपनी पात्र ठरल्याने याची निवड करण्यात आली आहे. या मत्स्यालयाच्या बांधकामामध्ये घुमटाकार मत्स्यालय, पद भ्रमण बोगदा मत्स्यालय, पॉप-अप विंडो आदींची सुविधा असेल. आयताकृती आणि वर्तुळाकार टाक्या बोगद्या मत्स्यालयाव्यतिरिक्त, या मत्स्यालयात अॅक्रिलिक पॅनल्समध्ये बनवलेले ०४ आयताकृती टाक्या, ५ वर्तुळाकार टाक्या आणि ०२ अर्धगोलाकार टाक्या बनवण्यात येणार आहेत. ज्यामध्ये विविध प्रकारचे मत्स्यजीव प्रदर्शित केले जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जलचरांसाठी मत्स्यालयाअंतर्गत नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी कृत्रिम रॉक वर्कची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे या मत्स्यालयाचे स्वरुप आहे.
(हेही वाचा – IPL 2025, RCB vs DC : विराट कोहलीचं कांतारा स्टाईलने सेलिब्रेशन; के. एल. राहुलशी पुन्हा बाचाबाची)
घुमटाकार मत्स्यालय कसे असेल?
बनवण्यात येणाऱ्या मत्स्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांचे आगमन होताच त्यांचे स्वागत छतामधील घुमटाकार मत्स्यालयाद्वारे होईल, ज्यामुळे पर्यटकांना जलचर जीवनाबद्दल कुतुहुल व आवड निर्माण होईल.
पद भ्रमण बोगदा मत्स्यालय
या मत्स्यालयामध्ये अॅक्रेलिक पॅनल्समध्ये बनवलेले दोन थीम-आधारित बोगदा मत्स्यालय समाविष्ट आहेत. एक १४ मीटर लांबीचे कोरल फिश बोगदा मत्स्यालय असेल आणि ३६ मीटर लांबीचे खोल महासागर बोगदा मत्स्यालय असेल, जे पर्यटकांना पद भ्रमणादरम्यान जलचर जीवनाचा अनुभव घेण्यास मदत करतील. (Rani Baug)
पॉप-अप विंडो अंतर्गत ३६० अंशांत पाहून शकतात जलचर
या मत्स्यालयात एका वेळी ०३ व्यक्ती सामावून घेणारी पॉप-अप विंडो सुविधा असेल. ज्यामध्ये मत्स्यालयाचे ३६० अंश दृश्य अगदी जवळून पाहू शकतात. ज्यामुळे विशेषतः मुलांना अनोखा अनुभव मिळू शकतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community