पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे येथे वाहतूक नियंत्रणासाठी अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित कॅमेरा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे नियम भंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सदरची यंत्रणा ही प्रूफ ऑफ कन्सेप्ट या प्रायोगिक तत्वावर चाचणी स्वरुपात बुधवार पासून सुरु करण्यात आली आहे. (Pune)
(हेही वाचा – Veer Savarkar Jayanti : स्वप्नील सावरकर यांचा माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते सत्कार)
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून शहराच्या वाहतुक नियमन व सुधारणा यासाठी नाविन्यपुर्ण बदल व अत्याधुनिक संसाधनाचा वापर केला जात आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाहतुक शाखा करीत असून, फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एआय बेस्ड कॅमेरा माध्यमातून नो पार्किंग, वाहतुकीस अडथळा करणाऱ्या डबल पार्किंग करणाऱ्या व इतर नियम भंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सदरची यंत्रणा ही प्रूफ ऑफ कन्सेप्ट या प्रायोगिक तत्वावर चाचणी स्वरुपात बुधवार पासून सुरु करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणा ही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांच्या संकल्पनेतून शहराच्या वाहतुक नियमन व सुधारणा यासाठी नाविन्यपुर्ण बदल व अत्याधुनिक संसाधनाचा वापर केला जात आहे.
पुणे शहरामध्ये पहिल्यांदाच एआय बेस्ड कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहनांनी नंबर प्लेट पडताळणी करुन वाहनाने कुठले वाहतुक नियमभंग केला असल्यास याची पडताळणी तात्काळ केली जाणार आहे व वाहन चालकास सदर सिस्टिमची माहिती व्हावी म्हणून फर्ग्युसन कॉलेज रोडवरती (Ferguson College Road) स्क्रीनच्या माध्यमातून सुध्दा माहीती दिली जाणार आहे. सदर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे वाहतूक नियमनाबरोबर नागरिकांचे वाहतूक नियमांबाबत जागृती करण्याचा प्रयत्न असणार आहे. सदर फर्ग्युसन कॉलेज रोडवरील प्रायोगिक तत्त्वावरील सिस्टिमचे विश्लेषण करुन वाहतुक नियमनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भविष्यात पुणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी व महत्वाच्या रस्त्यावरती या “ए.आय. आधारीत वाहतुक उल्लंघन शोध व अंमलबजावणी प्रणाली ” या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. सदर प्रणालीद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याने नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतुक शाखेकडून करण्यात आले आहे.
(हेही वाचा – धारावीचा पुनर्विकास एकात्मिक पद्धतीने करणार; CM Devendra Fadnavis यांची माहिती)
पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, मनोज पाटील, पुर्व प्रादेशिक विभाग डॉ.संदीप भाजीभाकरे, अति. कार्यभार पोलिस उपआयुक्त, वाहतुक शाखा, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पुणे वाहतुक शाखा व सेन्सेन एआय कंपनीचे विजय खुस्पे यांचे संयुक्त विद्यमानाने “ए.आय. आधारीत वाहतुक उल्लंघन शोध व अंमलबजावणी प्रणाली यामाध्यमातून नो पार्किंग असलेल्या ठिकाणी लावलेली वाहने व ३ मिनिटांपेक्षा जास्त मुख्य रस्त्यावरती वाहतूक अडथळा करेल अशा परिस्थितीत उभ्या असलेली वाहने एआय बेस्ड कॅमेराने टिपली जाणार असून, त्यांच्यावर वाहतुक शाखेच्या सीसीटीव्ही चलन प्रणालीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community